Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक : जिल्हाधिकारी, दीपक सिंगला

एप्रिल ३० पर्यंत जिल्हयात अंशत: लॉकडाऊन – आदेश जारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ५ एप्रिल: राज्यात सर्व ठिकाणी अंशत: लॉकडाऊन सुरू होत असून आपल्या जिल्हयातहीोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाणे योगदान देणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. आज राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या धर्तीवर नव्याने 30 एप्रिल पर्यंतचे आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जारी केले. यामध्ये जिल्हयात जमावबंदी, रात्री व आठवड्याच्या शेवटी संपूर्ण लॉकडाऊन अशा विविध निर्णयांबाबत आदेश देणेत आले आहेत. जिल्हयात रूग्णसंख्येबरोबर मृत्यूचेही प्रमाण काही प्रमाणात वाढत आहे. गेल्यावर्षीपेक्षा यावेळेस कोरोनाबाधितांची आकडेवारी झपाटयाने वाढत असून यासाठी आता प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेवून प्रशासनासोबत उभे राहणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज दिलेल्या आदेशात पुढिल बाबींचा समावेश आहे –

कलम 144 अंतर्गत जमावबंदी :- सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 7 ते रात्रौ 8 या कालावधीत पाच (05) हून अधिक लोकांना एकत्र जमण्यास मज्जाव असेल. सोमवार ते शुक्रवार रात्रौ 8 ते सकाळी 7 तसेच शुक्रवार रात्रौ 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत कोणत्याही सबळ/अतितातडीच्या कारणाशिवाय किंवा परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरण्यावर बंदी असेल. तथापि, अत्यावश्यक सेवा व वैद्यकिय क्षेत्राशी निगडीत व्यक्तींना वरील बंधन लागू नसेल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अत्यावश्यक सेवा यामध्ये या बाबीचा समावेश असेल – रूग्णालये तपासणी, निदान केंद्रे, रूग्ण तपासणी केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषध. निर्माण कार्यशाळा, औषध निर्माण करण्याच्या कंपन्या, औषधी विक्री केंद्र आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आस्थापना आणि उपक्रम. किराणामाल दुकान, भाजी विक्रीची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई विक्रीची दुकाने, खाद्यपदार्थ विक्री केंद्र. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था- रेल्वे, टॅक्सी, ॲटोरिक्शा, सार्वजनिक वाहतूक बसेस. विविध देशाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कामकाजाशी निगडीत सेवा. स्थानिक प्रशासनाद्वारा करावयाची मान्सूनपूर्व कामे. स्थानिक संस्थाव्दारा पार पाडल्या जाणारी सर्व सार्वजनिक स्वरूपाची कामे. मालवाहतूक, शेती क्षेत्राशी निगडीत सेवा, ई- कॉमर्स, प्रसार माध्यमे, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाने अत्यावश्यक म्हणून ठरविलेल्या सेवा/बाबी इत्यादी.
उद्याने/पार्क/सार्वजनिक मैदाने – शुक्रवारी रात्री 8.00 ते सोमवारी सकाळी 7.00 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहतील. तर सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी 7 ते रात्रौ 8 पर्यंत सुरु ठेवता येईल व रात्री 8.00 ते सकाळी 7.00 वाजेपर्यंत बंद असतील. सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या कालावधीत घराबाहेर पडतांना नागरीकांनी कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये मास्क लावणे, वेळोवेळी हात धुणे, सामाजिक अंतर राखणे इत्यादी सर्व बाबींचे अनिवार्यपणे पालन करणे गरजेचे असेल.

दुकाने, बाजारपेठा, मॉल्स इत्यादीबाबत:- अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद राहील.
सार्वजनिक वाहतूकीमध्ये राज्य शासनाने दिलेले आदेशा प्रमाणे ऑटो रिक्शा चालक + 2 प्रवासी फक्त, टॅक्सी (चार चाकी) चालक + 50% वाहन क्षमता (RTO नियमाच्या), बस -संपूर्ण बसण्याची क्षमता (RTO परवानगी प्रमाणे) नुसार प्रवासी बसविण्यास परवानगी असेल परंतु कोणासही उभे राहून प्रवास करण्यास मज्जाव असेल. सार्वजनिक वाहतुकीत, चारचाकी टॅक्सीमध्ये जर एखादया व्यक्तीने मुखवटा घातलेला नसेल तर त्या व्यक्तीला आणि टॅक्सी चालकाला प्रत्येकी 500/- रुपये दंड आकारला जाईल. सर्व सार्वजनिक वाहतुकीमध्ये कार्यरत चालक आणि इतर कर्मचारी हे लोकांच्या संर्पकात येत असतात त्यामुळे केंद्रशासनाच्या निकषानुसार त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करावे आणि पूर्णपणे लसीकरण होईपर्यंत 15 दिवसा पर्यंत वैध असलेले नकारात्मक कोरोना निकाल प्रमाणपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे. हा नियम 10 एप्रिल 2021 पासुन लागु होईल. जर वरीलप्रमाणे नकारात्मक RTPCR प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले किंवा वरीलप्रमाणे लसीकरण न केल्यास 1000/- रुपये दंड आकारला जाईल.

कार्यालये :- सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील. मात्र सुरू राहणाऱ्या कार्यालयामध्ये सहकारी, सार्वजनिक क्षेत्रातिल उपक्रम व खाजगी बँका, विद्युतपुरवठा संबंधित कंपन्या, टेलिकॉम सेवा पुरवठादार, वीमा, मेडिक्लेम कंपनी, औषधी उत्पादन/वितरण व्यवस्थापनासाठी असलेली कंपनी कार्यालये यांचा समावेश आहे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अपवादात्मक परिस्थतीत काही बाबी समाविष्ट करु शकेल. शासकीय कार्यालये 50% उपस्थिती क्षमतेने चालू राहातील. तथापि जी कार्यालये कोविड-19 साथरोग या कामकाजा संबंधित असतील ती कार्यालये 100% उपस्थितीत विभागप्रमुखांच्या निर्णयान्वये सुरु राहतील.

खाजगी वाहतूक:- खाजगी बसेससह खाजगी वाहने सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 07:00 ते संध्याकाळी 08:00 वाजेपर्यंत प्रवास करु शकतील तर आपातकालीन किंवा अत्याआवश्यक सेवाच्या उद्देशाने सोमवार ते शुक्रवार मध्ये संध्याकाळी 08:00 वाजेपासुन सकाळी 07:00 वाजेपर्यंत वा शुक्रवारी संध्याकाळी 08:00 वाजेपासुन ते सोमवारी सकाळी 07:00 वाजेपर्यंत प्रवास करु शकतील. याव्यतिरिक्त खाजगी बसेस करिता पूरक सूचना:- फक्त आसन क्षमतेसह वाहतुक करता येईल. सीटअभावी कोणताही प्रवासी उभा नसावा. खाजगी वाहतुकीमध्ये कार्यरत चालक आणि इतर कर्मचारी यांनी केंद्रशासनाच्या निकषानुसार लवकरात लवकर लसीकरण करणे आणि पुर्णपणे लसीकरण होई पर्यंत 15 दिवसा पर्यंत वैध असलेले नकारात्मक कोरोना निकाल प्रमाणपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे. हा नियम 10 एप्रिल 2021 पासुन लागू होईल.
करमणूक/मनोरंजन:- सिनेमागृहे बंद राहतील. नाटक थियेटर आणि प्रेक्षागृहे (auditorium)बंद राहतील. मनोरंजन पार्क/आरकेड/व्हीडीओगेम पार्लर बंद राहतील. पाण्याचे उद्याने बंद राहतील. क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा व क्रीडासंकुल बंद राहतील. तथापि उक्त आस्थापनाशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी केंद्रशासनाच्या निकषाप्रमाणे तात्काळ संपुर्णपणे लसीकरण करुण घ्यावे जेणे करुन शासन सर्व वरील प्रमाणे आस्थापना कोविड-19 चा प्रादुर्भाव अथवा प्रसार यांचा भितीशिवाय पुन्हा सुरु करु शकतील.

रेस्टारेंट, हॉटेल:- सर्व प्रकारचे रेस्टारेंट बंद असतील. सोमवार ते शुक्रवार पर्यंत सकाळी 07:00 ते संध्याकाळी 08:00 वाजेपर्यंत खाद्यपदार्थांची ऑर्डर, पार्सल आणि घरपोच सेवा सुरु ठेवता येईल. तथापि शुक्रवार सायं. 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत फक्त घरपोच सेवा सुरु राहील व कोणत्याही हॉटेल/रेस्टॉरेन्ट मध्ये ऑर्डर करिता भेट देता येणार नाही. हॉटेल मधील उपलब्ध जेवण्याची व्यवस्था केवळ सदर हॉटेल मध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींकरिता असेल.

धार्मिकस्थळे/प्राथनास्थळे:- धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे बंद राहतील. प्रार्थना स्थळांमध्ये सेवा देणा-या व्यक्तींनी मंदिराच्या आत पूजा-अर्चना करण्यास परवानगी असेल परंतू कोणत्याही बाहेरील व्यक्तीला प्रवेश देण्यात येवू नये. अशा स्थळी काम करणा-या सर्व व्यक्तींना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी केंद्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार लसीकरण करुन घ्यावे जेणेकरुन असे स्थळ पुन्हा खुले करण्यासाठी सोपे जाईल.

सलून दुकाने/स्पा/ब्‌युटी पार्लर दुकाने:- सलून दुकाने/स्पा/सलून व ब्युटी पार्लर पुर्णत: बंद राहतील. अशा स्थळी काम करणा-या सर्व कर्मचा-यांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी केंद्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे जेणेकरुन असे दुकाने पुन्हा खुले करण्यासाठी सोपे जाईल.

वृत्तपत्रे/वर्तमानपत्रे:- वर्तमानपत्रांची छपाई व वितरण सर्व दिवस करता येईल. घरपोच सेवा सर्व दिवशी सकाळी 7.00 ते रात्री 8.00 वाजतापर्यत परवानगी असेल. यामध्ये संलग्न असलेल्या सर्वांनी केंद्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्वरीत लसीकरण करुन घ्यावे. होम डिलीव्हरी करणा-या व्यक्तींनी Negative RTPCR प्रमाणपत्र सोबत ठेवावे, जे 15 दिवस वैध राहील. हा आदेश दिनांक 10 एप्रिल 2021 पासून अंमलात येईल.

शाळा व महाविद्यालये:- सर्व शाळा व महाविद्यालये बंद राहतील. 10 वी व 12 वी च्या परीक्षेस पात्र असणाऱ्या विद्यार्थ्याना यातून सुट देण्यात येत असून परीक्षा घेणा-या सर्व कर्मचारी वर्ग यांनी लसीकरण करुन घ्यावे किंवा त्यांनी RTPCR चाचणी Negative असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे. सर्व प्रकारचे खाजगी शिकवणी वर्ग बंद राहतील.

धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांबाबत:- कोणत्याही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांना परवानगी राहणार नाही. ज्या जिल्हयात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला अशा जिल्हयात जिल्हाधिकारी राजकीय सभांना खालील अटींच्या अधिन राहून मंजूरी देतील. लग्न समारंभात जास्तीत जास्त 50 वयक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी राहील. अंत्ययात्रेत जास्तीत जास्त 20 व्यक्ती सहभागी होवू शकतील आणि अंत्येयात्रेत सहभागी झालेल्या व्यक्तीचे पुर्ण लसीकरण होणे आवश्यक राहील किंवा त्यांचेकडे RTPCR Negative प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील.

रस्त्यांच्या कडेला/फुटपाथवरील खाद्य दुकांनाबाबत:- अशा दुकानात कोणतेही खाद्यपदार्थाची थेट विक्री करता येणार नाही. पार्सल सुविधा व घरपोच सेवा देता येईल. अशी दुकाने दर दिवशी सकाळी 7.00 ते रात्री 8.00 पर्यतच सुरु राहतील.

उद्योग/उत्पादन क्षेत्र:- उत्पादन विभाग खालील अटींच्या अधिन राहून कार्यरत राहील. कारखाना आणि उत्पादन घटक मध्ये काम करणा-या प्रत्येक कामगाराचे प्रवेशापुर्वी शारीरिक तापमान स्कॅन केले जाईल. सर्व कर्मचारी तसेच व्यवस्थापकीय अधिकारी यांचे पूर्ण लसीकरण करणे आवश्यक राहील. जर एखादा कामगार पॉजिटिव्ह आढळल्यास त्यांचे संपर्कात येणा-या सर्व कामगारांना क्वारंटाईन (विलगीकरण) करण्यात यावे व या कालावधीतील त्यांना मंजुरी देण्यात यावी.

ई-कॉमर्स:- भारत सरकारद्वारा ठरविण्यात आलेल्या निकषाप्रमाणे घरपोच वस्तु डिलीव्हरीच्या कामात गुंतलेल्या प्रत्येकांनी लवकरात लवकर लस घ्यावी. सदरच्या व्यक्तींनी स्वत:सोबत RTPCR नकारात्मक (Negative) प्रमाणपत्र ठेवावे. सदर प्रमाणपत्र 15 दिवसापर्यंत वैध राहतील. उपरोक्त नियम 10 एप्रिल 2021 पासून लागू होतील. वारंवार गुन्हा करणाऱ्या /नियमांचा भंग करणाऱ्या संस्था/आस्थापना यांचे परवाने कोविड-19 साथीचे रोग आटोक्यात आले असल्याचे जाहीर होत नाही तो पर्यंत रद्द/जप्त करण्यात येतील.

सहकारी गृहनिर्माण संस्था:– कोणत्याही सहकारी गृह निर्माण संस्था येथे 5 पेक्षा जास्त क्रियाशील कोरोना बाधित रुग्ण असल्यास, अश्या ठिकाणास सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र ( Micro Containment Zone) म्हणुन घोषित केले जाईल. अशा सहकारी गृह निर्माण संस्था यांनी त्यांच्या प्रवेश द्वारावर सूचना फलक लावून अभ्यागतांना आत येण्यास मनाई असल्याची माहिती नमूद करावी.

पायाभूत संरचना बाबत:– केवळ ज्या साइटवर मजुर राहतात त्याच साइट्सना कामांची परवानगी द्यावी. भौतिक हालचालींच्या(बांधकाम प्रक्रियेचे साहित्य/मटेरीयल) हेतू शिवाय बाहेरुन हालचाल करणे टाळावे. भारत सरकारद्वारा ठरविण्यात आलेल्या निकषा प्रमाणे सदरच्या कामात गुंतलेल्या प्रत्येकांनी लवकरात लवकर लस घ्यावी. तोपर्यंत त्यांनी सोबत RTPCR नकारात्मक (Negative) प्रमाणपत्र ठेवावे. सदर प्रमाणपत्र 15 दिवसापर्यंत वैध राहतील.

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी विना मास्क / रुमाल आढळून आल्यास दंडनीय कारवाई करण्यात येईल. विनामास्क आढळलेल्या प्रति नागरिकाला रु. 500/- दंड आकारण्यात यावा तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास रु. 1000/- प्रति माणशी दंड महसूल/पोलीस/स्था.स्व.संस्था यांनी वसूल करावे. उक्तप्रमाणे परवानगी नसलेले ठिकाणांमध्ये दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापना/दुकान हे राज्यात कोविड-19 साथरोग म्हणून जोपर्यंत घोषित असेल तोपर्यंत सील असेल. यांसंदर्भात आवश्यक कार्यवाही महसूल/पोलीस/स्था.स्व.संस्था यांनी करावे. सर्व प्रकारचे सामाजिक/सांस्कृतिक/राजकीय/धार्मि‍क इत्याूदी विषयक इतर सर्व प्रकारचे जमावावर बंदी राहील. सदर बाबीचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर व ती खाजगी जागा ज्यांचे मालकीची आसेल त्या जागा मालकावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, भारतीय दंड संहिता व साथरोग अधिनियम अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. तसेच सदरची जागा ही राज्यात कोविड-19 साथरोग म्हणून जोपर्यंत घोषित असेल तोपर्यंत सील असेल. यांसंदर्भात आवश्यक कार्यवाही महसूल/पोलीस/स्था.स्व.संस्था यांनी करावे. सामाजिक अंतर राखुन केवळ दैनंदिन बाजार भरविण्यास परवानगी देण्यात येत आहे. जिल्ह्यात कुठेही आठवडी बाजार भरवता येणार नाही. यांसदर्भात आवश्यक खबरदारी संबंधित स्था.स्व.संस्था यांनी घ्यावी. विवाहासंबंधीचे कार्यक्रमांना कमाल पन्नास (50) लोकांच्या मर्यादेत परवानगी असेल. तथापि याचे उल्लंघन केल्यास ती खाजगी जागा ज्यांचे मालकीची असेल त्या लॉन/हॉल/सभागृह जागा मालकावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, भारतीय दंड संहिता व साथरोग अधिनियम अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. तसेच सदरची जागा ही राज्यात कोविड-19 साथरोग म्हणून जोपर्यंत घोषित असेल तोपर्यंत सील असेल. यांसंदर्भात आवश्यक कार्यवाही महसूल/पोलीस/स्था.स्व.संस्था यांनी करावे. अंत्यसंस्काराच्या बाबतीत वीस (20) पेक्षा जास्त लोकांच्या जमावास मनाई आहे. सदर बाबीसंदर्भात आवश्यक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य स्ंस्थेची राहील. कोरानाबाधित रुग्णाला होम आयसोलेशन दिल्यानंतर त्यासंदर्भात शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे उचित कार्यवाही संबंधित आरोग्य विभागाने करावी. ज्याब व्यक्तीचे अलगीकरण/विलगीकरणासाठी अनिवार्य केलेल्याक व्यंक्तिंसाठी नियमाप्रमाणे कालावधी पूर्ण करणे अनिवार्य असेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नियंत्रित पद्धतीने सुरु ठेवण्यात यावे. कोविड-19 साथरोगसंदर्भाने सामाजिक अंतराचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांकडून संबंधित आगार व्यवस्थापक/अधिकारी/कर्मचारी प्रति माणशी रु.500/- एवढा दंड वसूल करण्यात यावा. कोविड-19 साथरोगसंर्दर्भाने एकूण टेस्टपैकी आरटीपीसीआर टेस्ट चे प्रमाण हे 70 टक्क्याहून अधिक असावे याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावे.

Comments are closed.