Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना केंद्राची आर्थिक मदत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २७ एप्रिल: कोविड-१९ ने ज्या पत्रकारांचे मृत्यू झाले आहेत त्यांच्या नजिकच्या नातेवाईकांना केंद्र सरकारच्या वतीने पाच लाख रूपयांची आर्थिक मदत केली जाते. त्यासाठी किती पत्रकारांचे कोरोनानं मृत्यू झालेत याची माहिती संकलित करण्याचे काम पत्र सूचना कार्यालय, पीआयबीच्यावतीने करण्यात येत आहे. ज्या पत्रकाराचे निधन झाले आहे त्यांच्या नातेवाईकांनी Additional Director General, press facilities PIB यांच्या नावाने अर्ज करायचे आहेत. त्यासाठी विशिष्ट नमुन्यात अर्ज करायचा असून अर्जाचा नमुना पीआयबी च्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेता येईल. अर्जासोबत काही कागदपत्रे पाठवायची आहेत. ती खालील प्रमाणे आहेत.
1) पत्रकार असल्याचा पुरावा
2) कोविड ने मृत्यू झाल्याची वैद्यकीय कागदपत्रे
3) डेथ सर्टिफिकेट
4)उत्पन्नाचे प्रमाणपत्र किवा आयटी रिटर्न भरल्याची कागदपत्रे
अर्जासोबत वरील कागदपत्रे जोडून हा अर्ज विशेष म्हणजे महाराष्ट्रात ज्या अधिस्वीकृतीचा राज्य सरकारने बाऊ करून ठेवला आहे.
त्या अधिस्वीकृतीची केंद्राची ही मदत मिळविताना गरज नाही हे विशेष. आपला अर्ज [email protected] या पत्यावर मेल करावयाचा आहे. ही माहिती PIB च्या वतीने देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कोविड-१९ ने १०९ पत्रकारांचे बळी गेले आहेत. महाराष्ट्र सरकारने पत्रकारांना वाऱ्यावर सोडले आहे. केंद्र सरकार आपल्या दिवंगत बांधवांच्या नातेवाईकांसाठी काही करणार असेल तर त्याचा लाभ दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना मिळवून देणे संघटना म्हणून आपले कर्तव्य आहे. सर्व तालुका आणि जिल्हा संघांनी आपल्या कार्यक्षेत्रातील दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना ही मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जमा करावीत आणि वरती दिलेल्या इमेलवर तो अर्ज पाठवून द्यावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी केले आहे. दिवंगत पत्रकारांची कुटुंबीय दुख:त असतात. ते ही सारी कागदपत्रे जमा करणे, मेल करणे हे सारं करू शकणार नाहीत तेव्हा तालुका आणि जिल्हा संघांनी पुढाकार घेऊन हे महत्वाचे काम करावे असेही आवाहन ही एस.एम.देशमुख यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.