Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

२ जून दिनविशेष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आजचे पंचांग (बुधवार, जून २, २०२१) युगाब्द :५१२३
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक ज्येष्ठय १२ शके १९४३
सूर्योदय : ०५:५७ सूर्यास्त : १९:०८
चंद्रोदय : ०१:२८, जून ०३ चंद्रास्त : १२:३६
शक सम्वत : १९४३ प्लव
चंद्र माह : वैशाख
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अष्टमी – ०१:१२, जून ०३ पर्यंत
नक्षत्र : शतभिषज – १७:०० पर्यंत
योग : विष्कम्भ – ०२:२७, जून ०३ पर्यंत
करण : बालव – १२:५३ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – ०१:१२, जून ०३ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : कुंभ
राहुकाल : १२:३३ ते १४:१२
गुलिक काल : १०:५४ ते १२:३३
यमगण्ड : ०७:३६ ते ०९:१५
अभिजितमुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:०६ ते १२:५९
अमृत काल : ०९:३२ ते ११:११
वर्ज्य : २३:४९ ते ०१:३१, जून ०३

||जीना यहाँ, मरना यहाँ
इसके सिवा जाना कहाँ
जी चाहे जब हमको आवाज़ दो
हम हैं वहीं, हम थे जहाँ
अपने यही दोनों जहां
इसके सिवा जाना कहाँ ||


चित्रपट निर्माता दिग्दर्शक राज कपूर – राज कपूर यांनी वयाच्या ११व्या वर्षी फ़िल्म इंकलाब मध्ये अभिनयाची सुरवात केली.बॉम्बे चित्रपटगृहात त्यांनी हेल्परचे काम तसेच सेटवर क्लैपर बॉय चे काम सुद्धा केले.

केदार शर्मा यांनी राज यांना नीलकमल चित्रपटात मधुबाला बरोबर नायकाची भूमिका दिली. वयाच्या २४व्या वर्षी ( १९४८ मध्ये ) आर. के. फिल्मची स्थापना केली. आग चित्रपट प्रदर्शित करून त्यात यश सुद्धा मिळवले. १९४८ ते १९८८ पर्यंत अनेक चित्रपटांची निर्मिती करून बॉक्स ऑफिस वर सुपर हिट झालेल्या अनेक चितपटात त्यांनी नायकाची भूमिका केली. नर्गिस बरोबर काम करताना बरसात, आवारा, श्री 420, चोरी चोरी हो जोडी फिल्म इंडस्ट्री मध्ये यशस्वी जोडी मानली गेली.


प्रेमरोग, मेरा नाम जोकर, संगम, जिस देशमे गंगा बहती है, अनाडी ह्या चित्रपटांना फिल्म फ़ेअर अवॉर्ड्सने सन्मानित केले .

भारत सरकारने १९७१ मध्ये पदम भूषण सन्मानाने तर १९८७ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले गेले.

१९८८: भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक राज कपूर यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर, १९२४)

* घटना
१८००: कॅनडात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.
१९४६: राजा उंबेर्तो-२ ला हटवून इटलीने राजेशाही संपवली स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
१९४९: दक्षिण अफ्रिकेने गोरे सोडुन इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.

• मृत्यू :
१९७५: वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक देवेन्द्र मोहन बोस यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर, १८८५)
१९९२ : महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचे निधन ((जन्म : २१ एप्रिल १९३४)
२०१४: भारतीय कार्डिनल दुर्यसामी सायमन लौरडुसामी यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९२४)

* जन्म :
१९०७: मराठी नाटककार आणि लेखक विष्णू विनायक बोकील यांचा जन्म.
१९४३: भारतीय संगीतकार इलय्या राजा यांचा जन्म.
१९५५: इन्फोसिस चे सहसंस्थापक पद्म भूषण नंदन निलेकणी यांचा जन्म.
१९५५: चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री मणिरत्नम यांचा जन्म.
१९६३: अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर, २०१२)

Comments are closed.