Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपूर येथे अल्पसंख्याक विद्यार्थिनीं साठी २०० प्रवेश क्षमतेचे वसतीगृह बांधण्यास मान्यता

अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क, दि. १७ जून : अल्पसंख्याक समाजातील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीं करिता नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठआवारात २००  प्रवेश क्षमतेचे वसतीगृह बांधण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय प्रक्रियेची पूर्तता करून या वसतीगृहाच्या बांधकामास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारसी आणि ज्यूसमाजातील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना या वसतिगृहाचा लाभ होणार आहे. या विद्यार्थिनींसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच विद्यापीठ आवारांमध्ये वसतीगृह बांधण्याचा निर्णय अल्पसंख्याक विकास विभागामार्फत घेण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे वसतीगृह बांधकामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या बांधकामासाठी १४ कोटी ८२ लाख रुपये इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रका सही प्रशासकीय मान्यता देण्यातआली असल्याचे मंत्री मलिक यांनी सांगितले.

नागपूर हे विदर्भ आणि परिसरातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्रआहे. इथे परिसरातील सर्व जिल्ह्यांमधील ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. पण निवासाची सोय नसल्याने अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होते. किंबहुना यामुळे अनेक मुलींचे शिक्षण ही थांबते. यासाठी प्रमुख शैक्षणिक केंद्र असलेल्या शहरांमध्ये खास मुलींसाठी वसतीगृहे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नागपुरात बांधण्यात येतअसलेले वसतीगृह सर्व सुविधांनीयुक्त, मुलींसाठी सुरक्षीतअशा पद्धती ने बांधण्यात येईल. नागपुरच्या शैक्षणिक कार्यात हे वसतीगृह महत्वपूर्ण ठरेल आणि विदर्भ परिसरातील अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या उच्चशिक्षणाला यामुळे मोठी चालना मिळेल, असा विश्वास मंत्री मलिक यांनी व्यक्त केला.

या संदर्भातील शासननिर्णय निर्गमित करण्यात आला असून तो महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

हे देखील वाचा : 

आ. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय पोलिसांच्या रडारवर

दूरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवास स्थानांची कामे तातडीने पूर्ण करावीत – गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई

गीरगाय जातीचे वळू ब्राझील मधून आयात करणार – पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.