Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दोन वर्षांपासून सोंडो येथील बंद पथदिवे तात्काळ सुरू करण्याची युवा स्वाभिमान पक्षाची मागणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

  चंद्रपूर  २९ ऑगस्ट : राजुरा तालुक्यातील राजुरा शहरापासून १४ कीमी अंतरावरील सोंडो येथील गावकऱ्यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरज ठाकरे यांना भ्रमणध्वनीद्वारे गावातील अत्यावश्यक विविध समस्या सांगताच जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी दिनांक २५ ऑगस्टला प्रत्यक्ष त्या गावी जाऊन त्या गावातील समस्या फेसबुक द्वारे थेट लाईव्ह येऊन प्रशासनासमोर आणण्याचा प्रयत्न केला. सोंडो या गावी एक ते दीड वर्षापासून पथ दिवे बंद पडलेले आहेत ज्यामुळे गावामध्ये रात्री अंधारात काहीही दिसत नाही. या गावातील रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत. तथा गावकऱ्यांना नियमितपणे मुबलक पिण्याचे पाणी मिळत नाही. पाणी सोडण्यासाठी ठराविक वेळ ठरविला नसल्याने  कुठल्याही वेळेवर पाणी सोडत असल्यामुळे लोकांना फक्त वाट पाहावी लागत असते. जाणीवपूर्वक गावकरी शेतावर गेल्यानंतर पाणी सोडण्यात येते तर ठराविक वेळ ठरवून नियमितपणे वेळेवर पाणी गावकऱ्यांना देण्याकरिता सुरज ठाकरे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून वेळेवर पाणी देण्यास सांगितले.

 

गेल्या दोन वर्षापासून नाल्यांची साफसफाई होत नसल्यामुळे मच्छर चे प्रमाण वाढल्याने गावकरी डेंग्यू सारख्या आजारास बळी पडत आहेत. या नाल्या साफ होत नसल्याने बुजून गेल्या आहेत ज्यामुळे सांडपाणी रस्त्यावर जमा होते. जे दुर्गंधी व रोगराई चे कारण या गावी खूप जास्त प्रमाणात ठरत आहे. तरीदेखील मच्छर मारण्याकरिता अद्याप या गावी फवारणी करण्यात आली नाही. गावामध्ये स्मशान भूमी ची व्यवस्था नसल्याने प्रेत नेमके कुठे जाळायचे असा गंभीर प्रश्न गावकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे. गावकऱ्यांनी स्मशानभूमीची व्यवस्था करून देण्याकरिता तथा स्मशानभूमी कडे जाण्याकरिता रस्ता करून देणे बाबत ग्रामपंचायतीमध्ये वारंवार अर्ज करून देखील ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले. शेवटी गावकऱ्यांनी कंटाळून स्वतःच्या शेतामधून आम्ही रस्त्याकरिता जागा देतो असे कबूल करून देखील सुद्धा सोंडो या गावातील ग्रामपंचायतसह राजुरा तालुक्यातील नगरपरिषद,  नगरपंचायत व आमदार सुभाष धोटे हे सर्व जणू काही माणसाच्या प्रति माणुसकी उरली नाही अशाप्रकारे यांच्या अधिकार क्षेत्रातील कामांकडे व गावातील विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे एकंदर चित्र सध्या स्थिती मध्ये दिसत आहे. तथा केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या सरकारी योजनांपासून देखील हे गाव वंचित आहे. घरकुल, हागणदारीमुक्त शौचालय, सदर गाव हे पेसा विभागा अंतर्गत येते असून देखील या गावात हागणदारीमुक्त करण्याकरिता ग्रामपंचायतच्या सचिवाकडून अद्याप कुठलेही पाऊल उचलले गेले नाही.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दुर्दैवाची बाब म्हणजे ही की राजुरा शहरापासून नगरपरिषद, पंचायत समिती व या विधानसभा क्षेत्रातील आमदारांच्या निवासस्थानापासून नुकतेच १४ कीमी अंतरावरील हे गाव व येथिल गावकरी अत्यावश्यक सेवांपासून वंचित असून देखील या गावी अशी दुरवस्था आहे. ही खूप मोठी शोकांतिका असल्याची सुरज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. या सर्व समस्या तत्काळ मार्गी लावण्याकरिता २६ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर तसेच २७ तारखेला सह उपविभागीय अधिकारी साहेब राजुरा, उप अभियंता साहेब महाराष्ट्र राज्य विद्युत पुरवठा विभाग, गट विकास अधिकारी साहेब पं.स. राजुरा आणि तहसीलदार राजुरा यांना निवेदन देऊन तात्काळ सर्व समस्या मार्गी लावण्यास सांगितले.

 

सूरज ठाकरे सह राजुरा तालुक्यातील युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी राजुरा तालुक्यातील प्रत्येक गावा गावात जाऊन लोकांशी भेटून गावातील समस्या जाणून घेत आहेत. त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांना भेटून समस्यांचा आढावा घेतल्या जात आहे. युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांच्या नेतृत्वात विविध विभागाच्या कार्यालयास निवेदन देण्यात आले. यावेळी राहुल चौहान, आल्वीन सावरकर, आशिष यमनुरवार, अमोल ताठे, मंगेश वडस्कर, निखिल बाजाइत व भूपेश साठोने उपस्थित होते.

 

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.