Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रचिती नामदे व संस्कुर्ती अर्सोडे कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षा पास

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क


गडचिरोली, दि. २९ सप्टेंबर : शोतोकान कराटे इंटरनॅशनल ऑफ इंडिया शाखा गडचिरोली च्या तर्फे कराटे बेल्ट परीक्षा घेण्यात आली.

या परीक्षेमध्ये येलो बेल्ट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आराध्य बेलखेडे, विमान गुड्डेवार,अथर्व गुड्डेवार, नेहाल पिसे, श्रावणी कोहळे ,सोम्या नेरकर, ऋत्विक गवारे, श्रेयश सम्रीत, तसेच ऑरेंज बेल्ट परीक्षेमध्ये- साई बावनवाडे, श्लोक चव्हाण ,अमय नामदे, प्रज्ञा सहारे, श्रावणी उमरे ,प्रथम कटकमवार,अर्जुन दिकोंडवार, स्वरा नेरकर ,अयांश वासेकर,दक्ष टिंगूसले, निहार दूधबावरे , ग्रीन बेल्ट परीक्षेमध्ये – अर्चित मेश्राम वेदांत देशमुख व सार्थक नेरकर यांनी परीक्षा पास केली तसेच ब्राऊन बेल्ट परीक्षेमध्ये समक्ष वाघमारे, आर्यन बावणे ,रोमन टिंगूसले ,अर्णव उंदीरवाडे, लावण्या कोवे ,धनश्री राऊत, त्याचप्रमाणे कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट परीक्षाही मोठी परीक्षा संबंधी जाते त्यामध्ये प्रचिती नामदे व संस्कृती अरसोडे या दोन अकरा वर्षाच्या मुलींनी हे परीक्षा पास केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या सर्व पास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संघटनेचे अध्यक्ष प्रशांत वाघरे, उपाध्यक्ष रूपराज वाकोडे गडचिरोली जिल्ह्याचे मुख्य कराटे प्रशिक्षक व संघटनेचे सचिव योगेश चव्हाण, मिलिंद कुमार गेडाम, सोनाली चव्हाण व आपल्या आई-वडिलांना आजी-आजोबांना दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.