Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पॅरासेलिंग करतांंना दोरी तुटली आणि दोन महिला कोसळल्या समुद्रात!…

रायगडच्या वरसोली किनाऱ्यावर धक्कादायक घटना. समुद्र पर्यटन सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रायगड : जिल्ह्यातील अलिबाग जवळील वरसोलीत पॅरासेलिंग करतांंना जीवघेणा अनुभव बीचवर आलेल्या पर्यटकांना आला. पॅरासेलिंग करताना पॅराशूटची दोरी तुटली व २ महिला पर्यटक १०० फूट उंचा वरून थेट खोल समुद्रात कोसळल्या. लाईफ जॅकेट घातले असल्याने दोघींना वाचविण्यात यश आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबईतील या दोन महिला सुजाता नारकर व सुरेखा पाणिकर, आपल्या कुटूंबासहित अलिबाग वरसोली बीचवर पर्यटनासाठी आल्या होत्या. यावेळी एकत्र पॅरासेलिंग करत असताना त्यांच्या पॅराशूटची दोरी तुटली. लाईफ जॅकेट मुळे त्या पाण्यावर तरंगत राहिल्या. बोटचालकाने या महिलांना पुन्हा बोटीत घेतले. या महिलांचे नातेवाईक बोटीवर होते त्यांच्या डोळ्यासमोर हा भयंकर प्रकार घडला.

२७ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. या बाबतचा विडिओ व्हायरल झाल्यामुळे ही घटना आता समोर आली असून सोशल मीडिया वर पसरली आहे. त्यामुळे समुद्र पर्यटन सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका!.. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती

तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना नवनिर्मित नगरपरिषद/नगर पंचायतीत सामावून घेणार; नगरविकास विभागाचा निर्णय

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायींनी हजारो मेणबत्त्यांनी उजळवले चवदार तळे

 

 

Comments are closed.