विर बाबुराव शेडमाके उपविभागीय स्तरीय कबड्डी स्पर्धेत पेरमिली संघ ठरला विजेता.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी २५ फेब्रुवारी: पोलीस चौकी आलापल्ली येथील भव्य पटांगणात विर बाबुराव शेडमाके उपविभागीय स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम व अहेरी पो.स्टे. पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या हस्ते विर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेस सुरुवात करण्यात आली.
अहेरी चे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अहेरी उपविभागातील पोलीस स्टेशन आष्टी,अहेरी, मूलचेरा,उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर,राजाराम,पेरमिली ,पोलिस मदत केंद्र येलचिल या 7 कबड्डी संघानी सहभाग घेतला .
या स्पर्धेत प्रथम क्रमांक यंग स्टार क्रिडा मंडळ पेरमिली ,द्वितीय क्रमांक जय गुरुदेव कबड्डी मंडळ आष्टी, गोंडवाना कबड्डी क्लब मुलचेरा तृतीय क्रमांक पटकाविला. .
. गडचिरोली पोलीस दला अंतर्गत पोलीस दादालोरा खिडकी माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना तसेच विविध प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच तसेच सदर योजनेचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी यावेळी पो.उपनिरीक्षक पंकज बोंडसे,पो.हवा.बांबोले,आस्तिक रामटेके,प्रशांत हेडाऊ, राणी पाटीवार,धर्मा तोरे आदी.पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments are closed.