Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नवनियुक्त राष्ट्रीय सचिव दिपक हिवरे यांचा वाहन चालक कर्मचारी संघटने मार्फत सत्कार..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
  • शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक वर्ग 3 कर्मचारी संघटनेची त्रेमासिक सभा आयोजित …
  • संघटनेनं केला नवनियुक्त राष्ट्रीय सचिव दिपक हिवरे यांचा सत्कार…

चंद्रपूर दि,२० जून : महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक वर्ग 3 कर्मचारी संघटनेच्या चंद्रपूर जिल्हा शाखेची त्रे मासिक सभा व सत्कार समारंभ रविवारी 19 जुन 2022 रोजी रामबाग येथील वनविभागाच्या वन विश्रामगृहात पार पडली. यावेळी उपस्थित वाहन चालकांच्या समस्यांचं निराकरण करून एकजुटीचा संदेश दिला गेला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संघटनेचे चंद्रपूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष दीपक हिवरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित केली गेली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाखेचे चंद्रपूर जिल्हाउपाध्यक्ष अशोक नामेवार, सचिव नरेंद्र शिडाम, सहसचिव प्रशांत अडपेवार, कोषाध्यक्ष प्रशांत बांबल, कार्याध्यक्ष संदिप अतकरे, प्रसिद्धी प्रमुख प्रविण गोंगले यांचेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हिवरे यांची ऑल इंडिया गव्हर्नमेंट ड्रायव्हर असोसिएशनच्या राष्ट्रीय सचिव पदावर निवड झाल्याबद्दल वनविभाग, वनविकास महामंडळ, जिल्हा परिषद, महानगरपालिका, बांधकाम व पाटबंधारे विभागासह अन्य शासकीय कार्यालयातील वाहन चालकानी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यानंतर मे महिन्यात आंध्रप्रदेशातील करनुल येथील राष्ट्रीय स्तरीय कार्यक्रमात सहभागी झालेल्या वाहन चालकांना सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं. त्यानंतर उपस्थित वाहन चालकांच्या प्रमुख मागण्या व समस्या जाणून घेण्यात आल्या.या सोबतच वाहन चालकांच्या वेतनश्रेणी संदर्भात मुंबई हायकोर्ट व मॅट मध्ये सुरू असलेल्या केस बद्दल चर्चा करण्यात आली. तसंच सेवानिवृत्त वाहन चालकांचा निरोप समारंभ आयोजित करणे, वाहन चालकांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव व मार्गदर्शन कार्यक्रम घेणे, आरोग्य शिबीर आयोजित करणे, वार्षिक वर्गणी गोळा करणे, यासह अन्य महत्वपुर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.

त्यानंतर शाखेचे अध्यक्ष हिवरे यांचेसह अन्य प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांनी मागण्या जाणून घेत मागण्या निकाली काढण्यासाठी संघटना पुर्ण ताकदीनिशी कामाला लागण्याचे आश्वासन दिले. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाच्या वाहन चालकांनी एकजुट व्हावे, असं आव्हानही यावेळी मान्यवरांनी केले. या सभेला रवी काटवे, वासुदेव सहारे, मधु चिवंडे, अमोल शेंडे, मकसुद पठाण, सुरेंद्र उईके, मनोज चव्हाण, निलेश मत्ते, एस पी आत्राम, के एस चहांदे, कुळसंगे यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषदेतील वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा ,

पुन्हा वाघाच्या हल्ल्यात आणखी एका शेतकऱ्याचा बळी.!

नरभक्षक वाघाने घेतला तिसरा बळी..

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.