Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माकडाच्या हल्ल्यात महिला जखमी..

गडचिरोलीत माकडांचा उच्छाद कायम..पिडीत महिलेला वनविभागाने नुकसान भरपाई देण्याची मागणी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ०७ जुलै: गडचिरोलीतल्या रामपुरी वॉर्ड कॅम्प येथे माकडाने माकडाने केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. भारती मुनघाटे ( 30) असे या महिलेचे नाव असून ती कामानिमित्त रामपुरी वॉर्ड कॅम्प येथे आली होती. रस्त्याने चालत असताना एका माकडाने अचानक तिच्यावर हल्ला केला. या हल्यात भारती यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी महिला ही अत्यंत गरीब असून तिला वनविभागाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

गडचिरोलीत माकडांचा उच्छाद कायम सुरू आहे. येथील रामपुरी वॉर्ड कॅम्प परिसरात कायमच माकडांचा हैदोस असतो, या अगोदर देखील अनेकांवर माकडांनी हल्ले केले आहेत, मात्र अनेक तक्रारी करून देखील
वन विभागाकडून कोणतीच दखल घेतली जात नाही. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. म्हणून वन विभागाने या हैदोस घालणाऱ्या माकडांचा तातडीने बंदोबस्त करावा तसेच, माकडाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला वन विभागाने तातडीने मदत करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.