Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी ! शिंदे सरकारला मोठा दिलासा.

न्यायालयाने दोन्ही बाजूच्या आमदारांवर निकाल येईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश दिले आहेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली 11 जुलै :- राज्यात घडलेल्या सत्तांतरादरम्यान 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतू तुर्तास राज्यातील स्थिती जैसे थे राहील असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे.

आज ही प्रकरणे खंडपीठासमोर सुनावणीस न आल्याने शिवसेनेच्यावतीने सरन्यायाधीशांकडे या सुनावणीबाबत विनंती करण्यात आली. त्यानंतर सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना हे निर्देश दिले आहेत. या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी घटनापीठ तयार करण्यासाठी काही अवधी लागणार असल्याचेही सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी म्हटले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मागील महिन्यात झालेल्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टने विधानसभा उपाध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेबाबत 12 जुलैपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश दिले होते. आज, शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी प्रकरण सुप्रीम कोर्टात ठेवलं. सिब्बल म्हणाले की, उद्या अपात्रतेबाबतचा विषय विधानसभेत ऐकला जाईल. जर कोर्टानं आज सुनावणी घेतली नाही तर विधानसभा अध्यक्ष यावर निर्णय घेऊ शकतात. जोवर यावर कोर्टा सुनावणी करत नाही तोवर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेऊ नये, अशी मागणी सिब्बल यांनी कोर्टाकडे केली. यावर कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना कोर्टाचा निर्णय येईस्तोवर कुठलाही निर्णय न घेण्याबाबत निर्देश दिले.

हे देखील वाचा :- गडचिरोली जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये तीन दिवस बंद राहणार..
👇

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वीज पडून 23 बकऱ्या ठार, शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान

वीज पडून 23 बकऱ्या ठार, शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान

Comments are closed.