Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिबट कातडे आणि खवल्या मांजर सिंपले ,विक्री प्रकरणी 7आरोपी वनविभागाच्या ताब्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गोंदिया 25 जुलै :-  गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी वन विभाग वन अधिकारी व नागपूर वन विभागामार्फत संयुक्त कारवाईचे वेळी सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी इथून बिबट कातडी व खवले मांजर शिंपले विक्री होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.प्राप्त माहितीच्या आधारे अवयवाच्या विक्री करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता मौजा खजरी गावात देवाण-घेवाण करण्याचे ठरविले होते. विक्रीसाठी आलेल्या आरोपींना नागपूर येथील पथक व गोंदिया वन विभागातील सडक अर्जुनी परिक्षेत्रातील कर्मचारी यांनी मौजा खजरी गावात अटक करून त्यांच्याकडून वन प्राणी बिबट्याची कातडी व खवल्या मांजराचे शिंपले आणि तीन दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आले.

सदर प्रकरणात सात आरोपी असून त्यांना ताब्यात घेतले आहे.निखिल अगडे वय 39 गोरेगाव, कैलास घुमके वय 24 खजरी, हेमराज ओकार 32 वर्षे चोपा मोहाडी, मिथुन घमके 28 वर्षे खजरी, मनोज मानकर 22 वर्षे सडक अर्जुनी, नरेश ठाकरे 29 वर्षे . थाटेझरी कोसमतोंडी,सदर आरोपीवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अनवे वन गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास  कुलराज सिंह उपवनसंरक्षक व  प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एस.जाधव करीत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

आजाराने ग्रस्त असलेल्या नागेपल्लीच्या “त्या” मुलीला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार कडून आर्थिक मदत

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.