महाआवास अभियानांतर्गत तालुकास्तरीय पुरस्काराचे आ.गजबे यांच्या हस्ते वितरण.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आरमोरी 12 ऑगस्ट :- आरमोरी-महाआवास अभियानांतर्गत येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्यस्तरीय आवास योजनेच्या उत्कृष्ट बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींना व ग्रामपंचायतीच्या सचिव, सरपंच, घरकुल अभियंता तसेच कृषी विभागातील सिंचन विहीर बांधकाम करणाऱ्या लाभार्थी व कर्मचाऱ्यांचा आज आरमोरी येथे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पंचायत समितीच्या सभागृहात तालुकास्तरीय पुरस्काराचे वितरण आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार कल्याण कुमार डहाट, पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी चेतन हिवंज, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कुमार कोकुडे, पंचायत विस्तार अधिकारी राजकुमार पारधी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये तालुकास्तरावरील सर्वोत्कृष्ट घरकुल म्हणून धर्मा बनकर (देउळगाव )यांनी प्रथम प्रेमानंद बावणे( मानापुर) यांनी द्वितीय तर धनंजय प्रधान (डोंगरगाव) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. राज्यपुरस्कृत आवाज योजनेत तालुकास्तरावरील सर्वोत्कृष्ट घरकुल मध्ये नरेंद्र गजभिये (जोगीसाखरा )यांनी प्रथम, उषा आत्राम (नरचूली) यांनी द्वितीय तर शामराव गेडाम (वैरागड) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला .प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून वासाळा या ग्रामपंचायतीने प्रथम देऊळगाव ग्रामपंचायत ने द्वितीय तर इंजेवारी ग्रामपंचायत ने तृतीय क्रमांक पटकाविला. राज्यपुरस्कृत आवास योजनेत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून कोरेगाव ग्रा.प. ने प्रथम, किटाळी ग्रामपंचायत द्वितीय तर भाकरोंडी ग्रा.पं ने तृतीय क्रमांक पटकाविला तर तालुकास्तरावरील सर्वोत्कृष्ट प्रधानमंत्री आवास योजने चे क्लस्टर म्हणून अभियंता राकेश चलाख तर राज्य पुरस्कृत आवाज योजनेचे क्लस्टर ग्रामीण घरकुल अभियंता चेतककुमार सलाम या सर्वांना आ.गजबे ,तहसीलदार डहाट यांच्या हस्ते शिल्ड,प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
आरमोरी पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत सिंचन विहीर बांधकामात पुष्पा रामटेके, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतिल सिंचन विहीर बांधकामात मुरलीधर शेंद्रे, श्रीराम रंधये व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील सिंचन विहीर बांधकामात चीनो ताडाम यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते भाजीपाला कीट, रोप व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तर मनरेगाच्या सिंचन विहीर बांधकामात सुभद्रा विश्वास (शंकर नगर) हिने प्रथम, जितेंद्र मिस्त्री (शंकर नगर) यांनी द्वितीय तर भास्कर सेलोकर व देवचंद डोनाडकर (पळसगाव) तृतीय क्रमांक पटकाविला.यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच घरकुल योजनेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वासाळा ग्रा.प.चे सचिव अमोल मडावी, देऊळगावचे विशाखा रामटेके, इंजेवारीच्या सचिव वर्षा कुमरे, कोरेगावचे सचिव उद्धव प्रधान, किटाळी चे सचीव सुरेश टिकले, भाकरोंडी चे सचिव नानाजी बनसोड, डोंगरगावच्या सचिव वंदना वाढइ, मानापूरच्या सचिव वैशाली ढोरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन केंद्रप्रमुख राजू वडपल्लीवार, प्रास्ताविक संवर्ग विकास अधिकारी चेतन हिवंज, तर आभार सांख्यकी विस्तार अधिकारी मडावी यांनी मानले.कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच, सचिव, ग्रा. प.सदस्य तसेच पंचायत समितीतील सर्व विभागाचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
हे देखील वाचा :-
वाह डॉक्टर.. मानलं बुवा.. पुराने वेढलेल्या गावात डॉक्टर पोहचले थेट डोंग्याने
Comments are closed.