Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आपल्या घरावर तिरंगा कसा लावावा” याबाबत ध्वजसंहिता

नागरिकांनी ध्वज संहितेचे पालन करावे - जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे नागरिकांना आवाहन.

लोकस्पर्श  न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. १२ ऑगस्ट :  ध्वजसंहितेनुसार आपला राष्ट्रध्वज हा हाताने कातलेला किंवा विणलेला अथवा मशिनव्दारे तयार केलेला असावा. सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी किंवा लोकरी पासून तयार केलेला तिरंगा चालेल, प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये. राष्ट्रध्वजाचा अर्थात तिरंगाचा आकार हा आयताकृती असेल. तसेच त्याची ठेवन 3:2 या प्रमाणात ठेवावी. ध्वज फडकवितांना हवामान कसेही असले तरी तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावा. म्हणजेच दिनांक 13 ऑगस्ट, 2022 ते दिनांक 15 ऑगस्ट, 2022 या तीनही दिवशी रोज सकाळी फडकवावा आणि सूर्यास्ता वेळी रोज उतरवावा. घरी लावलेल्या झेंडयाबाबतही हे आवश्यक आहे. राष्ट्रध्वज उतरवल्यानंतर व्यवस्थित आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा. तिरंगा फडकवतांना नेहमी झेंडयातील केशरी रंग हा वरच्या बाजूने आणि हिरवा रंग हा जमिनीच्या बाजूने राहीलयाची काळजी घ्यावी, यात चूक केल्यास तो तिरंग्याचा अवमान समजण्यात येतो. राष्ट्रीय ध्वज लावताना स्तंभाच्या वरच्या टोकावर लावावा. त्याला स्तभांच्या मध्ये अगर खाली किंवा इतरत्र लावू नये. राष्ट्रध्वज लावताना, इतर सजावटी वस्तू लावू नये, केवळ फडकवण्याआधी त्यात फुंल किंवा पाकळया ठेवण्यास मनाई नाही, तसेच राष्ट्रध्वज उतरवताना पूर्ण सावधानतेने आणि सन्मानाने हळूहळू उतरवावा. ध्वजावर कोणते प्रकारचे अक्षर चिन्ह लावू नये. तसेच ध्वज स्तंभाच्यावर अथवा आजूबाजूला काही लावू नये. ध्वज जमिनीपासून उंचावर लावावा. ध्वज जाणून-बुजून जमिनीवर अगर पाण्यामध्ये बुडणार नाही अशा प्रध्दतीने लावावा.

राष्ट्रीय ध्वजाचा वापर व्यवसायाकरिता करता येत नाही. तसेच त्याची अवहेलनाही करण दंडणीय अपराध आहे. त्यामुळे ध्वजाचा उपयोग गाडीवर झाकणे, इमारतीवर झाकणे, टेबलवर टेबल क्लॉथ प्रमाणे टाकणे, ध्वजाच्या कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करता येणार नाही ध्वजाचा रुमाल, उशी किंवा शर्ट आदीवर किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर भरतकाम किंवा छपाई करणे चुकीचे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राष्ट्रध्वज कुठल्याही प्रकारे फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला लावण्यात येऊ नये. तसेच तो एकाच वेळी इतर ध्वजासोबत एकाच काठीवर फडकवू नये. ज्या स्तंभावर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. त्या काठीवर वा स्तंभावर ध्वजाच्या टोकावर फुले किंवा हार यासारखी कोणतीही वस्तू, बोधचिन्ह ठेवू नये.

राष्ट्रध्वजाच्या कोणत्याही प्रकारे तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करु नये. राष्ट्रीय ध्वज उभारताना तो कोणत्याही पध्दतीने फाटणार नाही, याची काळजी घ्यावी. आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा आपला अभिमान आहे. आपली अस्मिता आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे अनादर होईल अशा प्रकारे कृत्य करु नये. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्या घराघरात हा ध्वज लावायचा आहे. त्यामुळे ही ध्वज संहिता पाळण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा, जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा – जिल्हाधिकारी संजय मीणा 

‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत एक लक्ष राष्ट्रध्वज फडकणार जिल्हयातील सर्व यंत्रणांच्या सहभागाचे आवाहन
जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, नगर परिषद / नगर पालिका आणि अधिनस्त सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत गडचिरोली जिल्हयामध्ये एकूण एक लक्ष राष्ट्रध्वज उभारले जावेत यासाठी नियोजन सुरु केले आहे. नागरिकांनी स्वयंप्रेरणेतून आपल्या घरावर राष्ट्रध्वज उभारुन उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा.

हे देखील वाचा : 

आरमोरी येथे निघाली भव्य तिरंगा रॅली.

महाआवास अभियानांतर्गत तालुकास्तरीय पुरस्काराचे आ.गजबे यांच्या हस्ते वितरण.

 

Comments are closed.