Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरोग्याची काळजी घेऊन विद्यार्थानी शिक्षणाकडे वळावे- शिक्षणाधिकारी निकम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली, दि. २४ नोव्हेंबर: कोरोनाच्या पाश्र्वभुमिवर राज्यात सर्वत्रशाळेची घंटा वाजली असुन विद्यार्थानी स्वःताच्या आरोग्याची व स्वच्छतेची काळजी घेऊन शिक्षणाकडे वळावे असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांनी केले . चामोर्शी येथील कृषक हायस्कूल येथे कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर सुरु झालेल्या शाळाची तपासनी करण्यासाठी आले असता त्यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन केले . यावेळी मुख्याध्यापक अरविद भांडेकर , विस्तार अधिकारी अमरसिंग गेडाम , केंन्द्र प्रमुख हिम्मतराव आभारे , शिक्षिका सुंनदा सुरजागडे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते . पुढे बोलताना निकम साहेब यांनी विद्यार्थ्यना स्वच्छतेकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे विषद केली . वेळोवेळी हात धुने आवश्यक असून हात न धुतल्यास संसर्ग होण्यास जागा आहे . शाळेत आल्यावर मॉक्सचा वापर , सामाजिक अंतर , सॅनिटायझर वापर , तापमान वऑक्सीजन लेव्हल तपासने गरजेचे आहे .एकत्र बसुन शाळेत डब्बा खाने टाळावे एखादा विद्यार्थी आजारी असल्यास औषध उपचार घेऊन घरीच राहावे व वर्गशिक्षकाला माहिती द्यावी . घरची व्यक्ती आजारी असल्यास शक्यता शाळेत येण्याचे टाळावे . घोडक्याने एकत्रशाळेत येऊ नये सर्वानी आपआपली काळजी घेऊन शिक्षण पुर्ण करावयाचे असल्याने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मार्गदर्शन विद्यार्थाना केले .

Comments are closed.