लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई 5 ऑक्टोबर :- वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघतात पाच जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असू fcन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमी झालेल्यांपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मध्यरात्री तीन वाजता हा अपघात झाला. एका मागून एक गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. पहाटे साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. त्यामुळे वरळीहून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला आहे.

अपघात झाल्यानंतर जखमींना नेण्यासाठी आलेल्या रूग्णवाहिकेलाही दोन गाड्यांनी धडक मागून दिली. या अपघातात एकून ५ गाड्यांचे नुकसान झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णायात दाखल करण्यात आले.
हे पण वाचा :-

Comments are closed.