Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज ठाकरे यांचा फडणवीसाना सल्ला !

अंधेरी ची निवडणूक लढवू नका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 16 ऑक्टोबर :-  एखाद्या लोकप्रतिनिधीचे अचानक निधन झाले की त्याठिकाणी पोटनिवडणुक होते. त्या पोटनिवडणुकीत दिवंगत लोकप्रतिनिधीच्या घरातीलच कुणाला तरी उमेदवारी दिली जाते, व श्यक्यतो ती निवडणूक बिनविरोध केली जाते. या रिवाजाला अनुसरून राज ठाकरे यांनी फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ही पहिली निवडणूक होतेय. ठाकरे आणि शिंदेगटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. राज ठाकरेंच्या आवाहनाला फडणवीस प्रतिसाद देणार का?  भाजप उद्या मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार का? हे पाहावं लागेल. एखाद्या नेत्याचं निधन झाल्यावर त्याच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास पोटनिवडणूक बिनविरोध होते. हा इतिहास आहे. राज ठाकरेंच्या पत्राला फडणवीसांनी प्रतिसाद दिला तर तोच इतिहास कायम राहू शकतो. आज सकाळीच आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर काही वेळातच राज ठाकरे यांनी फडणवीसांना हे पत्र लिहिलंय.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.