Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पाणीसाठा करण्यासाठी चिचडोह प्रकल्पाचे सर्व दरवाजे होणार बंद

नदीकाठी असणार्या गावातील नागरिकांना खबरदारीच्या सूचना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 17 ऑक्टोबर :- वैनगंगा नदीपर चिचडोह बॅरेज ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील द्वार संचलन कार्यक्रमानुसार बॅरेज की एकुलण लांबी 691 मी. असून 15.00 मिटर लांबीचे व 9.00 मी. उंचीचे लोखंडी दरवाजे बंद करून पाणीसाठी करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. 15 आॅक्टोबर 2022 पासून सर्व दरवाजे द्वार संचलन कार्यक्रमानुसार प्रथम नदी काठावरील व क्रमाक्रमाने नदीच्या मध्यभागातील द्वारे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीतील पात्रात उध्र्व बाजूस व नदीत आलेल्या उपनद्या व नाल्यांमध्ये पाणीसाठा निर्माण होणार आहे. आणि नदीतील पाण्याची पातळी वाढणार आहे.

वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे जिवीत व वित हानी होवू नये यासाठी सर्व लगतच्या गावांना, ग्रामपंचायतींना सुचना देण्यात आली असून त्यांनी आपल्या गावकर्यांना याबाबत दवंडी द्वारे सुचित करावे व नदी काठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतांमध्ये काम करतांना सर्तक राहण्याच्या सूचना द्याव्यात. या कार्यालयाने बुडीत क्षेत्रासाठी संपादीत केलेल्या शेतांमध्ये शेतीची कोणतीही कामे करू नयेत. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरू नदीवर आंघोळ करतांना, मासेमारी करणारे, रेती घाटातून रेती काढणारे, पशुपाक, नदीतुन ये-जा करणार्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा होणार्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस कार्यालय जबाबदार राहणार नही असे उपकार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ९६ टक्के मतदान

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

स्टार्टअप यात्रेच्या दुसर्या टप्प्याचे एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर स्पर्धा संपन्न

Comments are closed.