ब्रिटनच्या पंतप्रधानांनी केला कोअर कमेटीत एका भारतीयाचा समावेश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
लंडन, 28 ऑक्टोबर :- भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी आणखी एका भारतीयाचा त्यांच्या कोअर कमेटी मध्ये समावेश केला आहे. प्रज्वल पांडे असे त्या भारतीयाचे नाव आहे.
बिहारच्या सीवानमध्ये जन्मलेले प्रज्वल पांडे केवळ 16 व्या वर्षी ब्रिटनच्या कंजर्वेटिव पक्षाचे सदस्य बनले. याआधी ते 2019 मध्ये युके पार्लियामेंट मध्ये सदस्य होते. युवा खासदार म्हणून ब्रिटेनच्या संसदेत त्यांनी जेव्हा भाषण केले तेव्हा तेथील नागरीक पण त्याचे फॅन झाले. त्यांची बहिण प्रांजण पांडे केम्ब्रिज युनिवर्सिटीमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. प्रज्वल पांडे हे ऋषी सुनक पंतप्रधान होण्याआधी त्यांच्या पक्षाच्या मुख्य अभियान टीममध्ये सहभागी होते. आता सुनक पंतप्रधान झाल्याने कोअर कमेटीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
हे पण वाचा :-
Comments are closed.