Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाढवण बंदर नकोच, स्थानिकांची मागणी

अर्नाळा ते शिर्डी बाईक रैली काढून शिर्डीच्या साईबाबांना घातले साकडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर, 03 नोव्हेंबर :- सुमारे पाच हजार एकर जमीनीवर भराव टाकून पालघर जिल्ह्यातील वाढवण या समुद्र किनारी असलेल्या गवात जेएनपीटी कडून महाकाय बंदर उभारले जाणार आहे. या विरोधात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती व विविध संघटना मागील अनेक वर्षापासून या प्रस्तावित बंदाराविरोधात जोरदार लढा देत आहेत. मात्र, केंद्र सरकार हे बंदर वाढवण येथेच व्हावे म्हणून आग्रही आहे. त्यामुळे वाढवण बंदर नकोच अशी मागणी स्थानिकांची असून यासाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या युवकांनी अर्नाळा ते शिर्डी बाईक रैली काढून शिर्डीच्या साईबाबांना साकडे घातले. आता साईबाबच यातून काही मार्ग काढतील असा विश्वास वाढवण गावकर्यांना वाटत आहे.

स्थानिक मच्छिमार, बागायदार आणि भूमीपुत्र मागील 18 वर्षापासून हा संघर्ष पूर्ण लढा देत आहेत. या वाढवण बंदरामुळे आयात निर्यातीला चालना मिळणार आहे. परंतु यामुळे भूमिपुत्र, लघु उद्योजक, स्थानिक मच्छिमार हे बेघर होउन खुप मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. या बंदरामुळे बेघर, बेरोजगार होणार्या स्थानिक भूमीपुत्राला वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासाठीच अखेर वाढवण गावातील वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या युवकांनी शिर्डीच्या साईबाबानांच साकडे घालायचे ठरवले आणि त्यासाठी 50 दुचाकीस्वाळ अर्नाळा ते शिर्डी बाईक रैलीत सहभागी झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.