Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सर्पमित्रांनी दिले अजगराला जीवनदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सडक अर्जुनी, 06 नोव्हेंबर :-  सडक अर्जुनी तालुक्यातील प्रणित जागेश्वर पटोले यांच्या शेतात धान कापत असतांना मजुरांच्या पायाजवळ 9 फूट लांबीचा एक मोठा अजगर साप आढळून आला. शेतात इतका मोठा साप दिसल्याने शेतात काम करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अजगर मोठा असल्याने शेतात काम करणाऱ्या व शेतकऱ्यांची गर्दी फार मोठ्या प्रमाणात वाढत होती. यावेळी प्रणित पटोले यांनी  त्वरित नेहमी सृष्टी फाऊंडेशन सडक अर्जुनी चे सदस्य सर्पमित्र व प्राणीमित्र मोहित नंदागवळी व राज खोब्रागडे यांना फोन करून बोलवून घेतले. त्वरित दोघेही सर्पमित्र शेतात पोहोचले व त्यांनी लोकांना दूर करून सावधतेने त्या विशाल अजगराला कोणत्याही पद्धतीची इजा न होऊ देता सुखरूप रित्या पकडले. यावेळी शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

पण त्या सापाला पकडल्यावर लक्षात आले की, त्याच्या तोंडाला इजा झाली आहे. त्याला प्रथमोपचाराची गरज आहे. त्यामुळे संस्थेचे सदस्य जोशील नंदागवळी यांना बोलवून पशुवैद्यकीय अधिकारी सडक अर्जुनी यांच्याकडे नेण्यात आले. सापाचा प्रथम उपचार करण्यात आला. नंतर सापाला नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले. या वेळी संस्थेचे सचिव उमेश उदापुरे, सदस्य शुभम नंदेश्वर, हर्ष राऊत आणि वनविभागाचे अधिकारी आनंद बंसोड आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संध्या थंडीचे व धान कटाईची वेळ सुरु असून शेतकरी व मजूर शेतात निर्भय होऊन काम करीत असतात. या वेळी उन सेकण्यासाठी साप धान्याचा मोकळ्या बांध्यात झोपलेले असतात. त्यामुळे धानाच्या कडपा, बोझे उचलताना नीट बघून घ्यावे. असे आव्हान संस्थेचे सचिव उमेश उदापूरे यांनी केले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.