सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 42 वर्षानंतर उघडले शिरपूर येथील आंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिराचे द्वार.
भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
वाशीम, 11 मार्च :- जगरातील जैन धर्मीयांची काशी म्हणून प्रख्यात असलेल्या वाशीम जिल्ह्यातील शिरपुर जैन येथील आंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदीराचे द्वार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तब्बल ४२ वर्षानंतर उघडले असु गत ४ दशकांपासून भाविकांची दर्शनाची प्रतिक्षा संपली आहे. त्यामुळे जैन धर्मीय तसेच जिल्हाभरातील भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
व्हिओ: दिगंबर आणि श्वेतांबर या या दोन पंथीयांमधील मालकी हक्काच्या वादामुळे हे मंदीर गत ४२ वर्षांपासुन कुलुप बंद होते. १९८१ पासून हा वाद न्यायालयात सुरू होता. दरम्यान २२ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने मंदिर उघडून मुर्तीला लेप लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ११ मार्च रोजी ४२ वर्षापासून बंद असलेल्या मंदिराचे द्वार पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांच्या उपस्थितीत उघडण्यात आले. येत्या दोन महिन्यात हे मंदिर सर्वांना दर्शनासाठी खुले होणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली.
हे पण वाचा :-
Comments are closed.