Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उन्हाच्या तीव्रतेमुळे विदर्भात 30 जून रोजी सुरु होणार: दिपक केसरकर

विदर्भात यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने आणि मुलांना आपल्या सुट्ट्यांचा नीट आनंद घेता यावा, यासाठी हा निर्णय

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 18 एप्रिल :उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर राज्यातील शाळा या 15 जूनपासून सुरू करण्यात येतात. त्याचप्रमाणे यंदाही राज्यातील शाळा या 15 जूनला सुरू करण्यात येणार आहेत. पण यामधून विदर्भातील शाळांना वगळण्यात आले आहे. विदर्भातील सर्व शाळांना 29 जूनपर्यंत उन्हाळ्याची सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे 30 जूनला विदर्भातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून देण्यात आलेली आहे. विदर्भात यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने आणि मुलांना आपल्या सुट्ट्यांचा नीट आनंद घेता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे दीपक केसरकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे स्वरुप
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील शिफारशींनुसार व संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयांनुसार 2030 पर्यंत सर्व तरूण आणि प्रौढ, पुरूष आणि स्त्रिया अशा सर्वांनी 100 टक्के साक्षरता आणि संख्याज्ञान संपादन करणे हा योजनेचा मूळ हेतू आहे. राज्यात शिक्षण संचालनालय (योजना) तसेच महाराष्ट्र राज्य नव भारत साक्षरता परिषदेमार्फत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

येत्या शैक्षणिक वर्षात एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे ‘आजी आजोबा दिवस’ साजरा केला जाणार आहे असं दिपक केसरकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाणार. 20 मे पर्यंत सर्व त्रूटी पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना अनुदान देण्यात येणार आहे.  शिक्षक सेवकांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीमध्येही वाढ करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी इंटरनेटद्वारे माहिती दिली जाईल आणि स्पर्धा घेतल्या जाणार असल्याचं दिपक केसरकर म्हणाले. ते म्हणाले की, शाळांमध्ये interactive TV लावले जाणार. कमी पटसंख्येंच्या शाळा बंद कराव्या लागू नयेत यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. पायाभूत सुविधा वाढवल्या जाणार आहेत. मराठीकडे आकर्षित करण्यासाठी उच्च शिक्षणही मराठीमध्ये करणार आहोत. मुलाच्या शाळेतील पहिल्या पावलाचे स्वागत केलं जाणार.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

 

Comments are closed.