महाराष्ट्रातील पहिली अंतराळ प्रयोगशाळा मुळशी येथे.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
पुणे, 22 एप्रिल: पुण्याजवळील मुळशी येथील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये इस्रोच्या स्पेस ट्यूटर प्रोग्राम अंतर्गत व्योमिका स्पेस अकादमीचे संस्थापक गोविंद यादव आणि अकादमीचे सल्लागार समितीचे सदस्य डॉ. प्रतिक मुणगेकर यांच्या पुढाकारातून कलाम माशेलकर स्पेस अँड इनोव्हेशन सेंटरची स्थापना करण्यात आली असून या सेंटर चे उद्घाटन नुकतेच पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुळशी येथील ही अंतराळ प्रयोगशाळा भारतातील दुसरी आणि महाराष्ट्रातील पहिली प्रयोगशाळा असून या मधे स्पेस लॅब रॉकेट सायन्स, सॅटेलाइट, एप्लिकेशन्स ड्रोन, रोबोटिक्स, व्हर्च्युअल रिअॅलिटी, थ्रीडी प्रिंटिंग, एअरक्राफ्ट्स इत्यादीसारख्या नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर विविध प्रकारचे कार्यक्रम केले जाणार असून लॅबची स्थापना व्योमिका स्पेस अकादमीने इस्रोच्या स्पेस ट्यूटरच्या दृष्टीकोनातून केली आहे.
या प्रयोगशाळेत चांद्रयान 1, मंगळयान 1 उपग्रह मॉडेलसह SLV 3, ASLV, PSLV, GSLV D1, GSLV MK III, SSLV सारखे ISRO अंतराळ प्रक्षेपकांचे स्केल मॉडेल्स अभ्यासासाठी स्थापित केले आहेत. प्रयोगशाळेत दोन दुर्बिणी बसवण्यात आल्या असून त्याद्वारे अंतराळात घडणाऱ्या विविध घटनांचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याशिवाय रोबोट किट, लाईट फॉलोइंग किट, ब्लूटूथ कंट्रोल रोबोट्स, क्वाडकॉप्टर ड्रोन इत्यादी गोष्टी प्रयोगशाळेत पाहता येतील.
शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेतील विविध तंत्रज्ञानाची सखोल माहिती उपस्थितांसमोर सांगितली त्याचप्रमाणे अंतराळात घडणाऱ्या विविध घटनांची विस्तृत माहिती दिली. संध्याकाळी पुष्पक यान, गरुड विमान, गगन विमान यांसारखी लहान रेडिओ नियंत्रित विमानांचे रिमोट पायलटिंग तसेच व्योमिका स्पेस अकादमी ने बनवलेले ड्रोन चे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या प्रसंगी इस्रो चे जेष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ टी. एन. सुरेशकुमार शाळेचे संस्थापक कृष्णा जी भिलारे, संचालक कुणाल भिलारे, शाळेच्या प्रशासकीय व्यवस्थापिका, यशस्विनी भिलारे, गोविंद यादव, कुलगुरू आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रतिक मुणगेकर, प्राचार्या रेणू पाटील, डॉ. पी के रजपूत, रवींद्र रसाळ, शिक्षण अधिकारी के डी भुजबळ तसेच शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.
हे पण वाचा :-
Comments are closed.