Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोटूल भूमीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे विजयादशमी कार्यक्रमात खा.अशोक नेते यांचे प्रतिपादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली दि. 26/ऑक्टो: गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या गोटूल भूमीत गेल्या 25-30 वर्षांपासून विजयादशमीच्या दिवशी मोठा उत्सव साजरा करण्यात येतो आज ती परंपराच झाली असून आदिवासी देवतांची पूजा-अर्च्या गोटूल भूमित केली जाते. याठिकाणी मोठ्या संख्येत आदिवासी बांधव एकत्र येऊन सहभाग घेतातसध्या गोटूल भुमित सोयी- सुविधांचा अभाव असल्याने भाविकांना राहण्यासाठी व्यवस्था नाही. त्यासाठी आपण गोटूल च्या विकासासाठी राज्य व केंद्र शासनाकडून निधी मंजूर करणार असून या गोटूल च्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजपचे अनुसूचित जमाती मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली लगतच्या चांदाळा मार्गावरील गोटूल भूमीत विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आज दि. 25 ऑक्टोबर रोजी पूजा -अर्चा करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ देवरावजी होळी, माजी आमदार डॉ नामदेवजी उसेंडी, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा चे प्रदेश संघटन महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुतीरकर, आदिवासी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नंदुभाऊ नरोटे, नाजूकराव पुराम, गावड साहेब, शिक्षण विभागाचे कोडाप व आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, सदस्य व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदिवासी देव- देवतांची पूजा करून तदनंतर खासदार अशोक नेते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.दरवषी येथे आदिवासी मेळावा व विविध कार्यक्रम घेतल्या जातात मात्र यावर्षी कोविड-19 मुळे कमी संख्येत सामाजिक दुरावा ठेवून विजयादशमी निमित्य छोटेखानी कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आला.

Comments are closed.