Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोटी रुपयांचा रस्ता पाण्यात गेला वाहून

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

पेरमिली, 21 जुलै – राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय निधीतून पेरमिली ते डाबरेंचा रस्त्यावरील या नवीन कामाची पावसाळ्या आधी विकासाची काम काही महिनाभरातच काम पूर्ण केल्याचा दिसून आला, आता चक्य येन पावसाळ्यात जागोजागी खड्डे पडून रस्ता खचल्याने कामाचा दर्जा उघडा पडला आहे. कोटी रुपये खर्चून नवीन रस्ता करण्यात आलेल्या या रस्त्याची पहिल्याच पावसात वाताहत झाल्याने सरकारचा निधी अक्षरशः पाण्यात गेला असून, या दर्जाहिन कामाबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. गेल्या दहा पंधरा वर्षांपासून पेरमिली, येरमनार, डाबरेंचा, या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असल्याने त्यावरून वाहन चालक व नागरिकांचा धोकादायक पध्दतीने प्रवास सुरु होता.

रस्त्यावरील खड्यांमुळे वारंवार अपघात होऊन त्यात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. पेरमिली नदीला आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी रस्ता वाहून गेला व खचला होता. मात्र संबंधीत ठेकेदाराने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हे काम घाईगडबडीने व दर्जाहीन पध्दतीने उरकण्याचा प्रयत्न केला असेल असं नागरीक व्यक्त करत आहेत. काम सुरू असताना मुरुमाऐवजी माती वापरणे, त्यावर पाणी मारुन प्रेसींग करणे,खडीकरण व डांबरीकरण करताना नित्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, डांबराचा अत्यल्प वापर, अशा अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. मात्र, त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन रस्त्याचे काम उरकले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दर्जाहिन पध्दतीने झालेल्या या रस्त्याची पहिल्याच पावसात अक्षरश: वाट लागली असून, महिनाभरातच जागोजागी खड़ी मोकळी होऊन खड्डे पडू लागले आहेत. तर दोन्ही बाजूने व्यवस्थित चर न काढल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन रस्ता खचू लागला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम दर्जेदार पध्दतीने पुन्हा करण्यात यावे, अशी मागणी पेरमिली येथील ग्रामस्थ व भाजप युवानेते व पेरमिली येथील भाजप युवा मोर्चाचे प्रशांत भाऊ ढोंगे यांनी केली आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.