Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गाव संघटनेच्या मागणीनुसार विविध गावात व्यसन उपचार शिबीर

90 जणांनी घेतला लाभ

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 2 ऑगस्ट 2023 ; गावातील दारूच्या व्यसनाचे प्रमाण लक्षात घेता गाव संघटनेच्या मागणीनुसार विविध गावात मुक्तीपथ तर्फे व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून 90 जणांनी उपचार घेऊन व्यसनमुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

आरमोरी तालुक्यातील वासाळा या गावामध्ये व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले असता 11 रुग्णांनी उपचार घेतला. धानोरा तालुक्यातील कुथेगाव येथे 16 पेशंटनी पूर्ण उपचार घेतला. सिरोंचा तालुक्यातील ग्लासफोर्डपेठा येथे 10, पेडलाया येथे 13 पेशंट, कोचिनारा येथे 11, गोडेली 14, गेवर्धा येथील एक दिवसीय गाव पातळी व्यसन उपचार शिबिरात 15 पेशंटनी पूर्णवेळ उपचार घेतला. अशा एकूण 90 जणांनी उपचार घेतला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विविध गावात आयोजित शिबिराला भेट दिलेल्या रुग्णांना तज्ञानी समुपदेशन व औषधीउपचार केला. या शिबिराचे नियोजन मुक्तीपथ तालुका चमूने केले तर यशस्वीतेसाठी विविध गावातील संघटनेच्या सदस्यांनी सहकार्य केले.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.