शेतकऱ्यांनो,ओळ पद्धतीने धान लागवड करा; जोरदार फुटवे येतील !
कृषी काॅलेजच्या विद्यार्थीनींनी शेतीच्या बांधावर जाऊन दिले धडे
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
चामोर्शी, 6 ऑगस्ट 2023 : चामोर्शी येथील केवळरामजी हरडे महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी ४ ऑगस्ट रोजी ओळ प्रत्यारोपण या आधुनिक धान लागवड पद्धतीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले मुरखळा ( चक ) शेतकरी अतुल भिवनकर, अब्दुल भिवनकर, सौरभ पाल, केशव देऊरमले बंडु भिवनकर यांच्या शेतात कृषी महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी ओळ प्रत्यारोपण पद्धत लागवडीबदल प्रात्यक्षिक केले, तसेच लागवडीचे महत्व पटवून दिले सदर प्रात्यक्षिक प्राचार्य डॉ आदित्य कदम, सहायक प्रा. सी. ए. दुधबळे, सहायक प्राध्यापक टी. व्ही. बारस्कर, प्रा. ए. ए. डोंगरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले यावेळी विद्यार्थीनी अंकिता राठोड, पुनम बोदनवार, चैताली सोनेवाने, ओजल टेंभुर्णे, तनु बोरुटकर उपस्थित होते.
मुरखळा ( चक ) येथील एका शेतात खोळ पद्धतीने धानाची लागवड करतांना विद्यार्थीनी व शेतकरी
ओळ पद्धतीचे फायदे कोणते ? ओळ प्रत्यारोपण पद्धत वापरताना दोन ओळींतील अंतर सारखे ठेवावे लागते. परिणामी, धान पिकांत हवा खेळती राहून अधिक फुटवे येतात उत्पादनातही वाढ होते. तसेच पिकाला पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत कमी पानी लागते आणि पिक आंतरमशागतीसाठी सोयस्कर होते. असे फायदे विद्यार्थीनींनी सांगितले.
हे पण वाचा :-
Comments are closed.