Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गावागावात शिबीर ; 93 जणांना नको दारुचे धोकादायक व्यसन

मुक्तिपथ गाव संघटनेचा पुढाकार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 10 ऑक्टोंबर : गाव संघटनेच्या माध्यमातून दुर्गम व ग्रामीण भागात वसलेल्या विविध गावात मुक्तिपथ तर्फे व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. यावेळी दारूच्या धोकादायक व्यसनामुळे त्रस्त झालेल्या 93 रुग्णांनी उपचार घेतला.

मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली येथे एक दिवसीय व्यसन उपचार शिक्षण क्लिनिक घेण्यात आले. यामध्ये एकुण 25 पेशंटची नाव नोंदणी केली व 20 पेशंटनी पूर्ण उपचार घेतला.  शिबिराचे नियोजन तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी केले. शिबिर यशस्वीतेसाठी पोलिस पाटील तिम्मा पेसा अध्यक्ष रमेश तिम्मा, भुमया मस्तरे झोरे व इतर गावातील मंडळी यांनी मदत केली. धानोरा तालुक्यातील कोसमी येथे एक दिवसीय व्यसन उपचार शिक्षण क्लिनिक घेण्यात आले. यामध्ये एकूण 22 पेशंटने पुर्ण उपचार घेतला. शिबीराचे नियोजन भास्कर कड्यामी तर शिबिर यशस्वितेसाठी गाव पाटील उदेसिंग मडावी, पेसा सचिव बुधा नैताम, सिंगु होळी, सेवन मडावी, इतर गावातील मंडळी यांनी मदत केली. पेशंटची केस हिस्ट्री संयोजक प्रभाकर केळझरकर तर   समुपदेशन व तपासणी छत्रपती घवघवे यांनी केले. तसेच पेशंट ला दारूचे दुष्परिणाम व धोक्याचे घटक समजावून सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भामरागड तालुक्यातील हेमलकसा  येथे गाव पातळी व्यसन उपचार शिबीरमध्ये 13 रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. शिबिरात रुग्णाची केस हिस्ट्री संयोजक  दशरथ रमकाम यांनी घेतली तर रुग्णांना समुपदेशन व औषधी माहिती  पूजा येल्लूरकर यांनी दिली. रुग्णांची नोंद तालुका प्रेरक विद्या पुंगाटी यांनी केली. क्लिनिक चे व्यवस्थापन व नियोजन तालुका कार्यकर्ता  आबिद शेख यांनी केले. यशस्वी करण्याकरिता गाव प्रमुख  रामलू सदमेक, रामा महाका, चिंनू महाका यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे या गावातील हे 5 वे शिबीर आहे. गडचिरोली तालुक्यातील गुरवडा येथील शिबिरातून 21 जणांनी उपचार घेतला.अहेरी तालुक्यातील कासमपल्ली येथे एकदिवसीय व्यसन उपचार शिक्षण शिबिरात एकूण ८ रुग्णांनी उपचार घेतला.  एटापल्ली तालुक्यातील नेंडेर येथे गाव पातळी क्लिनिक मध्ये 9 पेशंट ने उपचार घेतला आहे. पेशंटची नोंदणी रविंद्र वैरागडे, स्पार्क कार्यकर्ता राजेश, उत्कर्ष यांनी केली. क्लिनिक चे नियोजन  तालुका संघटक किशोर मलेवार व गाव संघटन यांनी केली.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-  

Comments are closed.