Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव इंद्रधनुष्य २०२३ चे थाटात उद्धघाटन

आयुष्यात यश मिळवायचे असल्यास स्वतःवर विश्वास ठेवा हवा: अलिशा मेलानी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 17 ऑक्टोंबर : जिथून मी शिक्षण घेतले तिथून मला आज बोलावणे आले याचा मला सार्थ अभिमान आहे. मला शिकण्याची प्रचंड आवड होती. शिकत असतांना दोन वर्षाच्या काळात अनेक संधी विद्यापीठामध्ये मिळाल्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेता आला.राज्यस्तरीय इंद्रधनुष्य स्पर्धेत सहभागी होता आले.

आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे आयुष्यात यश मिळवायचे असल्यास स्वतःवर विश्वास ठेवायला हवा असे प्रतिपादन दक्षिणात्य सिने अभिनेत्री आलिशा मेलानी यांनी गोंडवाना विद्यापीठा तर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव इंद्रधनुष्य च्या उदघाटना प्रसंगी केले. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच मॉडेल आणि अभिनय क्षेत्रात कशी संधी मिळवता येईल याविषयी मार्गदर्शन केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवामहोत्सव इंद्रधनुष्य २०२३ चे आयोजन विद्यार्थी विकास विभाग, गोंडवाना विद्यापीठ ,गडचिरोली यांच्यातर्फे करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन आज, सुमानंद सभागृह, आरमोरी रोड,गडचिरोली येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, उद्घाटक म्हणून दक्षिणात्य सिनेअभिनेत्री तथा मॉडेल अलिशा मेलानी (गोंडवाना विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी), विशेष उपस्थिती म्हणून अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. अनिल चिताडे, रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे, विद्यार्थी विकास मंडळाचे सदस्य डॉ. इमॅन्युअल कोंड्रा, संचालक(प्र.) विद्यार्थी विकास डॉ. प्रिया गेडाम आदी उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे म्हणाले, इंद्रधनुष्य हे एक व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी आहे, विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वेगळं वळण देण्यासाठी हा कार्यक्रम आहे एक वेगळं व्यक्तिमत्त्व निर्माण होते, बक्षीस मिळणे हा हेतू आहे, पण तिथे गेल्यावर वेगळा अनुभव येतो, डेयरिंग येते, प्रत्यक्षात कला गुण सादर करता येते, अलिशा मॅडम कडे बघितल्यावर काय मिळाले हे कळते, गडचिरोली जिल्हा सांस्कृतिक दृष्टीने अतिशय प्रगल्भ आहे, अनेक चांगले झाडीपट्टी नाटके आहे,त्यामुळं न्यूनगंड बाळगू नये औरंगाबाद ला चांगला सादरीकरण करायचे आहे
सर्व स्पर्धकांना शुभेच्छा, चांगल्या वातावरणात स्पर्धा होतील, असा विश्वास व्यक्त केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण म्हणाले, दाक्षिणात्य सिने अभिनेत्री अलिशा मेलानी यांच्या कडे बघितल्यावर आपल्याला समाधान मिळते, कुठलीही गोष्ट रेडिमेड मिळत नाही पॅशन असावे लागते. जीवनात कुठलेही ध्येय मोठे असले पाहिजे कठोर परिश्रम पाहिजे, ध्येय निश्चित करणे आणि ते मिळविण्यासाठी परिश्रम घेणे महत्वाचे आहे. आपल्यातील प्रत्येकात राजहंस दडला आहे
आपले स्वप्न, इच्छा पूर्ण करण्यासाठी परिश्रम करा, न्यूनगंड बाळगू नका, हा इंद्रधनुष्य व्यासपीठ म्हणजे संधी आहे असे ते म्हणाले.

प्रास्ताविक डॉ. प्रिया गेडाम यांनी केले संचालन आणि आभार जनसंपर्क अधिकारी वर्षा कोल्हे यांनी मानले.हा महोत्सव १७ ते १९ ऑक्टोबर असा तीन दिवसीय चालणार आहे .या सांस्कृतिक महोत्सवाला उदघाटना नंतर लगेचच सुरुवात होणार असून यात शास्त्रीय नृत्याला सुरुवात झाली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.