Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराला मुडझा गावात मोठा प्रतिसाद

खासगीकरण गरीबांच्या जिवावर बेतणारे : जयश्रीताई जराते

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 17 ऑक्टोंबर : सध्याचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार नोकरी, शाळा, दवाखान्याचे खासगीकरण करीत असून या खासगीकरणामुळे गरिबांना नोकऱ्या, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा मिळणे येणाऱ्या काळात कठीण होणार असून सार्वजनिक क्षेत्रातील खाजगीकरण गरिबांच्या जिवावर उठणारे असल्याची टीका शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते यांनी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तालुक्यातील मौजा मुडझा येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिरादरम्यान त्या बोलत होत्या. चष्मे वाटप कार्यक्रमाला मुडझाचे सरपंच शशिकांत कोवे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीहरी चौधरी पोलीस पाटील तुलाराम राऊत, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, शेकापचे पदाधिकारी विठ्ठल भोयर, आनंदराव जेंगठे, माधवराव जेंगठे, ग्रामसेवक डी. ए. वायबसे, विठल भोयर,अविनाश येमुलवार प्रामुख्याने उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शिबिरात दोनशेहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात येवून ५७ रुग्णांना चष्मे, ६४ रुग्णांना औषधीचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी मोतीबिंदूचे ४९ रुग्ण आढळून आले. डोळे तपासणी डॉ.नानाजी मेश्राम यांनी केली. तर शिबिराकरीता आकाश आत्राम, महेंद्र जराते, बादल दुधे यांचेसह शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.