Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी प्रकल्पातील सहा शाळांचा निकाल 100 टक्के

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी, 22 मे – काल जाहीर झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेतील निकालात स्थानिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील बामणी सह जीमलगट्टा येथील कला तर पेरमिली येथील विज्ञान शाखेतील शासकीय आणि लगाम व मुलचेरा येथील विज्ञान शाखेतील अनुदानित आश्रम शाळांसह सिरोंचा येथील नामांकित आश्रम शाळेच्या सुद्धा शंभर प्रतिसाद निकाल लागल्याने प्रकल्पात त्यांनी नाव उंचावले आहे.

प्रकल्पात असलेल्या चार शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळांचा निकाल 97टक्के तर तीन अनुदानित आश्रम शाळांचा निकाल 96.30 प्रतिशत लागला आहे.शासकीय आश्रम शाळा खमनचेरू येथील कु. पल्लवी सतीश वेलादी ही विज्ञान शाखेत तर शासकीय आश्रम शाळा बामणीचा प्रणय कोहाडा मडावी याने कला शाखेत संपूर्ण प्रकल्पात शासकीय आश्रम शाळांमधून प्रथम येण्याचा मान पटकविला आहे.तसेच एकमेव सिरोंचा येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम या नामांकित स्कूल मधील विज्ञान शाखेतील तृप्ती साधू दुर्वा ही संपूर्ण प्रकल्पात 80.50 प्रतिषत गुणांसह प्राविण्याने उत्तीर्ण झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रकल्पात बारावीच्या सर्व चारही शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा मधून कला शाखेत 120 विद्यार्थी बसले. यापैकी 116 विद्यार्थी पास झाले. यात शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा जीमलगट्टा व बामणी येथे 100 प्रतिशत निकाल लागला आहे. उलटपक्षी विज्ञान शाखेत पेरमिली येथील आश्रम शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

प्रकल्पातील तीनही अनुदानित उच्च माध्यमिक आश्रम शाळांच्या निकालात लगाम व मूलचेरा येथील भगवंतराव उच्च माध्यमिक शाळेने विज्ञान शाखेत 100 प्रतिशत यश संपादन केले.लगाम येथील अनुदानित उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील निरंजन यशवंत डब्बा तर अहेरी येथील विजय पल्लो यांचा प्रकल्पात प्रथम व द्वीत्तीय क्रमांकाने पास झालेत. विज्ञान शाखेत प्रकल्पात लगाम मधील अजित नरोटे व गुरुपती सिडाम यांनी गुनाणूक्रमे क्रमांक प्रथम व द्वितीय घेतला आहे.प्रकल्पातील यशवंत विद्यार्थ्यांचे प्रकल्प अधिकारी आदित्य जीवने, सहाय्यक प्रकल्पाधिकारी सुहास वसावे, सहाय्यक शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यभान डोंगरे व इतर प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.