Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त मुक्त व्हावा असे माझे स्वप्न आहे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपुर,21 जुलै – बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त मुक्त व्हावा असे माझे स्वप्न आहे त्याकरता आपल्याला हवे तेवढे सहकार्य नक्कीच मी करणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. केंद्रीय मंत्री मंडळात समावेश झाल्यानंतर बुलढाणा जिल्हा नागरिक मंडळ नागपूर आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांचा भव्य सत्कार समारंभ व स्नेह मेळाव्याचे आयोजन नागपुरातील जवाहर वसतिगृह सिव्हिल लाईन नागपूर येथे करण्यात आलेले होते त्यावेळेला ते बोलत होते.

बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे तो कार्यान्वित व्हावा म्हणून त्याकरिता 4000 कोटी रुपये मंजूर केली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. दरम्यान विकास झपाट्याने व्हावा म्हणून सुमारे 670 किलोमीटर लांबीचे महामार्गयी याच जिल्ह्यात तयार केले आहेत जलसंवर्धन खात्याचा मंत्री असताना आपण स्वतंत्र प्रकल्प बुलढाणा राबविले आता त्याचे फायदे निश्चितच समोर येत असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. सिंचनाचा अभाव असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काही वर्षांपूर्वी आत्महत्या केल्या यामुळे या जिल्ह्याविषयी संपूर्ण देशात नकारात्मक चित्र निर्माण झाले होते पण आता बहुतांश सिंचन प्रकल्प कार्यान्वित होण्याच्या मार्गावर असल्याने यातून परिसर सुजलाम सुफलाम होईल असेही गडकरी म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

केंद्रीय मंत्रिमंडळात माझा समावेश हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिफारस केल्यानेच झाला. प्रधानमंत्री यांनी मला जे अपेक्षित होत की आपल्याला काम करीत असताना ग्रामीण भागातील लोकांची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे, लोकांशी संबंधित असणार खात जर मिळालं तर आपण लोकांमध्ये राहू शकतो, लोकांची कामे करू शकतो ही जी माझ्या मनामध्ये कल्पना होती ती आदरणीय मोदिजीनी प्रत्यक्षात आणली याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो असे सत्काराला उत्तर देत असतांना त्यांनी सांगितले. दरम्यान विकास कार्यात नितीन गडकरी यांचे माझ्यावर आणि बुलढाणा जिल्ह्यावर विशेष प्रेम राहिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आज त्यांनी केलेल्या सहकार्यातून बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प मार्गी लागले आहेत असेही ते म्हणाले. यापुढे पुढील काळात जिल्ह्याचा वेगाने विकास होईल अशी भूमिका केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी मांडली.

Comments are closed.