हजारो कार्यकर्त्यांसह जयश्रीताईंनी भरला उमेदवारी अर्ज
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पक्ष आणि प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई वेळदा – जराते यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करीत सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.
शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते, भाई शामसुंदर उराडे, जिल्हा सरचिटणीस संजय दुधबळे, आझाद समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, कार्याध्यक्ष विनोद मडावी, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, चामोर्शी तालुकाध्यक्ष रघुनाथ वासेकर, शेकापच्या महिला जिल्हाध्यक्षा कविता ठाकरे, पोर्णिमा खेवले, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा बाबनवाडे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवित्र दास, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डंबाजी भोयर, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामदास आलाम, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शर्मिश वासनिक, भाई अक्षय कोसनकर यांच्या नेतृत्वात शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयापासून लाल – निळे झेंडे घेऊन रॅली काढण्यात आली.
यावेळी गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पक्ष आणि प्रागतिक आघाडीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments are closed.