Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार हरिरामजी वरखडे यांचे निधन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आरमोरी : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार हरिरामजी वरखडे यांचे आज 2 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता दरम्यान नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारदरम्यान निधन झाले.

सुरवातीला शिक्षकी पेशात असतांना झाडीपट्टी रंगभूमी च्या माध्यमातून अनेक भूमिका साकारलेले वरखेडे गुरुजी जनमाणसात अत्यंत लोकप्रिय होते. त्यांची लोकप्रियता बघून शिवसेनेने 1990 मध्ये त्यांना आरमोरी विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली. त्यावेळी त्यांनी तब्बल 36 हजार 528 मते घेत विजयी पताका फडकविली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

1990 ते 1995 च्या दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेचे पहिले आमदार होण्याचा बहुमान त्यांनी पटकविला होता. नंतर ते छगन भुजबळ यांच्यासोबत काँग्रेसवासी झाले होते. समाजकारण व राजकारणात नेहमीच सक्रिय राहणारे वरखडे गुरुजी अत्यंत सुस्वभावी व मनमिळाऊ होते. कुरखेडा, कोरची सह आरमोरी विधानसभा क्षेत्रातील दुर्गम भागात त्यांनी गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.

काही दिवसापूर्वी त्यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया देखील झाली होती. मात्र पुन्हा प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु होते. मात्र आज 2 नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मावाळली. त्यांच्या पच्छात पत्नी, मुलगी, जावाई, नात व बराच मोठा आप्त परिवार आहे. उद्या त्यांच्या पार्थिवावर मुळगावी जोगीसाखरा येथे सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पुर्वी काही वेळासाठी आरमोरी येथे त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवन्यात येणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.