Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शरद पवारांचा महायुतीला इशारा

सरकार बदलल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

महाविकास आघाडीकडून खासदार शरद पवार हे विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना राज्यभरात दौरे करून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. शरद पवारांनी आज धाराशिवमध्ये जाहीर सभा घेतली  त्यावेळी  परांडा विधानसभा मतदारसंघातील  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे यांचे प्रचारासाठी आयोजित सभेत  त्यांनी महायुतीवर निशाणा साधला  इतकंच नाहीतर राज्यातील सत्ता  बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धारही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, ओमराजे निंबाळकर मला तुमची गोष्ट आजिबात पटली नाही. या वयातही मी फिरतो असे तुम्ही म्हणालात, मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. शांत बसणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करत निर्धारच व्यक्त केला. पुढे शरद पवार असेही म्हणाले, या लोकांच्या हातात सत्ता देऊन तुमच्या प्रश्नांची सोडवणूक या महाराष्ट्रात होतेय. हे बघितल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. आता एक म्हातारा खांद्यावर बसून आलेला पहिला का? असेही पवार म्हणाले. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, रणजित पाटील उपस्थित होते. परांडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर राहुल मोटे यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत विधानसभा निवडणुक लढवत आहेत. या लढतीकडं संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.