मते मिळवण्यासाठी दारूचा वापर करणार नाही व जिल्हा दारूबंदीला समर्थन उमेदवारांनी दिला वचननामा
मुक्तिपथच्या आवाहनाला प्रतिसाद
लोकस्प
गडचिरोली : निवडणुकीत मी व माझा पक्ष मते मिळवण्यासाठी दारूचा वापर करणार नाही. मी गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीचे समर्थन करतो, असे वचन होणार्या विधानसभा निवडणूकी करिता उभे असलेल्या उमेदवारांनी दिले आहे. मुक्तिपथच्या आवाहनाला प्रतिसाद देत गडचिरोली मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मनोहर पोरेटी, अहेरी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम, मनसेचे उमेदवार संदीप कोरेत, अपक्ष उमेदवार दीपक दादा आत्राम या उमेदवारांनी होणारी विधानसभेची निवडणूक दारूमुक्त व्हावी, सोबतच गडचिरोली जिल्ह्याच्या दारूबंदीला आमचे समर्थन आहे, असा वचननामा दिला आहे.
या निवडणुकीत निवडून आल्यास अथवा न आल्यास जिल्ह्यातील दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मी पूर्णपणे प्रयत्न करीन. असे वचननाम्यामध्ये या सर्व उमेदवारांनी वचन दिले आहे. धर्मरावबाबा आत्राम यांनी फक्त लिखित तर इतर सर्व उमेदवारांनी लिखित व रेकोर्डेड पद्धतीने वचननामे दिले आहे. जनतेच्या माहिती साठी व निवडणूकी नंतर या नेत्यांना जाब विचारता यावा यासाठी लिखित वचननामा व रेकोर्डेड व्हिडिओ समाज माध्यमामध्ये प्रकाशित केले आहे. निवडणूक नंतर जनतेला वचन पूर्तीचा हिशोब या नेत्यांना मागता येणार आहे. सर्वच मतदार संघातून इतर उमेदवारांचे वचननामे घेणे सुरू आहे. वचननामा द्या, कोणत्याही स्थितीत वचनाचा भंग होऊ देऊ नका, असे आवाहन उमेदवारांना केले जात आहे.
Comments are closed.