कॉंग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांची भाजपवर बोलतांना जीभ घसरली, त्यांच्या वक्तव्यानं नवा वाद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अकोल्यातील जनता भाजी मार्केटजवळच्या मैदानावर काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण यांच्या प्रचाराकरिता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. तेथील काँग्रेसच्या प्रचारसभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. भाजपला कुत्रा बनविण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य नाना पटोले यांनी भरसेभत मतदारांसमोर केलंय. या सभेत नाना पटोले यांनी केलेल्या भाजप संदर्भातील वादग्रस्त वक्तव्याने नवा वाद होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नाना पटोलेंनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीवर सुद्धा निशाणा साधलाय. ‘अकोला’ हा मतांचं विभाजन करणारा सेंटर बनला असल्याचे नाना पटोले म्हणाले. आज भाजपला फायदा करणारे काही लोक निवडणुकीच्या मैदानात आहेत, पण सुदैवाने अकोला पश्चिममध्ये ते नाहीत. त्यामुळे भाजपचे धन्यवाद करतोय आणि साजिद खान पठाणनेही मस्त जुगाड जमावला असल्याचे मिश्कील वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय.
Comments are closed.