बड्या उद्योजकांसाठी आदिवासींच्या जमिनी लाटल्या
प्रियांका गांधी यांचा भाजपवर आरोप
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : केंद्र सरकारमध्ये दहा वर्षे, तर महाराष्ट्रात अडीच वर्षांपासून सत्तेवर बसलेल्यांना सामान्यांचे प्रश्न सोडवता आले नाही शिक्षण, आरोग्याची दुरवस्था दूर झालेली नाही. बेरोजगारी भरमसाट वाढली आहे. बड्या उद्योजकांसाठी गोरगरीब आदिवासींच्या जमिनी ओरबाडण्याचे काम केले, असा घणाघाती आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला. जिल्ह्यातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांनी २० नोव्हेंबरला डोळसपणे निर्णय घ्या, असे आवाहन केले. आरमोरी क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ देसाईगंज येथे आयटीआय मैदानावर प्रियांका गांधी यांनी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी जाहीर सभेला संबोधित केले.
यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान, महाविकास आघाडीचे आरमोरी क्षेत्राचे उमेदवार रामदास मसराम, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, उद्धवसेनेचे सुरेंद्रसिंह चंदेल आदी उपस्थित होते. महाविकास आघाडीचे आरमोरी क्षेत्राचे उमेदवार रामदास मसराम, यांचे देसाईगंज येथिल सभेला संबोधित करताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी. हि विधानसभा निवडणूक तुमच्या आत्मसन्मानाची आहे. त्यामुळे २० रोजी जागरूक व सतर्क राहून मतदानाचा हक्क बजवावा. अर्जुनाप्रमाणे आपले एकच लक्ष्य ठेवा, कोणाच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. गांधी यांनी आपल्या भाषणातून महिला, बेरोजगार, शेतकरी, आदिवासी बांधवांना साद घातली. त्या म्हणाल्या, कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशात काँग्रेसने मतदारांना दिलेल्या आश्वसनांची पूर्तता सत्तेत बसल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सुरू केली. आम्ही विकासाची गॅरंटी घेतो अन् शब्द पाळतो.
गडचिरोलीत आजही आरोग्य, शिक्षण, रस्त्याचे प्रश्न सुटलेले नाहीत. मृत मुलाला घेऊन एका पित्याने १५ किलोमीटर पायपीट केली, रुग्णवाहिका मिळत नाही. ही दुरवस्था संपणार तरी कधी, असा सवाल त्यांनी केला. सिकलसेल, अॅनिमिया ही इथली समस्या आहे. राज्यात १६ हजार, तर एकट्या गडचिरोलीत चार हजारांवर अधिक रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी संस्कृती ही अतिशय महान आहे, असे आमच्या आजी इंदिरा गांधी नेहमी उल्लेख करत, अशी आठवण त्यांनी जागवली. त्या आरमोरी क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ देसाईगंज येथे आयटीआय मैदानावर प्रियांका गांधी यांनी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी जाहीर सभेला संबोधित केले.
Comments are closed.