62 जणांनी उपचार घेत दारूचे व्यसन सोडण्यासाठी सुरु केली वाटचाल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कायदा लागू आहे. परंतु जिल्हयात अवैध दारूविक्री मोठया प्रमाणावर सुरु आहे. अवैध दारूविक्रेत्यांवर पोलीस विभाग व मुक्तिपथतर्फे कार्यवाही करणे सुरु आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मुक्तिपथतर्फे तालुका स्तरावर दारूबंद व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून दारूमुळे आर्थिक, सामाजिक व आरोग्याचे नुकसान झालेल्या 62 जणांनी उपचार घेत दारूचे व्यसन सोडण्यासाठी वाटचाल सुरु केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कायदा लागू असून अवैध दारूविक्रेत्यांवर पोलिस विभागाच्या माध्यमातून सातत्याने कारवाई केली जात आहे. तसेच अवैध दारू विक्री विरोधात मुक्तिपथ व गाव संघटनेच्या माध्यमातून सातत्याने जागृती करून विविध कृत्या केल्या जात आहेत. अवैध दारूविक्रीमुळे दुर्गम, ग्रामीण व शहरी भागात दारूचे व्यसन लागलेल्या रुग्णांना तालुका मुख्यालयी उपचार मिळावे, यासाठी मुक्तिपथ तर्फे जिल्हाभरातील बाराही तालुक्यात व्यसन उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात येते. नुकतेच 62 रुग्णांनी तालुका क्लिनिकच्या माध्यमातून उपचार घेतला. यावेळी तज्ञ समुपदेशक व संयोजकांनी रुग्णांना मार्गदर्शन, औषोधोपचार करीत दारूचे व्यसन सुटू शकते, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
हे ही वाचा ,


Comments are closed.