Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली नगर परिषदेचे कंत्राटी सफाई कामगार संपावर

शहराच्या अनेक भागांत स्वच्छतेची ऐसीतैशी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली नगर परिषद प्रशासनाने नियमित कामगारांमार्फत कचरा संकलन व शहर स्वच्छतेचे सुरु ठेवले मात्र या कामगारांची संख्या कमी असल्याने शहराच्या अनेक भागांत स्वच्छतेची ऐसीतैशी झाली. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. कामगारांच्या संपामुळे गेल्या पाच दिवसांपासून कचरा संकलनाचे काम ठप्प पडले. नाली उपसाचे कामही बंद पडले. परिणामी शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. मुख्य बाजारपेठेत अनेक ठिकाणी कचरा साचला आहे. घराघरांतील कचऱ्याच्या डसबीन पूर्णतः भरल्या आहेत. घंटागाडी फिरत नसल्याने गृहिणी त्रस्त झाल्या आहेत. परिणामी पालिकेने शहर स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

गडचिरोली : नगर परिषदेचे कंत्राटी सफाई कामगारचे दोन महिन्यांची मजुरी प्रलंबित असल्याच्या कारणावरून आर्थिक अडचणीत सापडलेल्या सफाई कामगारांनी ५ डिसेंबर (गुरुवार)पासून कामबंद आंदोलन पुकारले असल्याने शहरातील स्वच्छतेचे काम प्रभावित झाले. दरम्यान प्रशासनाने नियमित कामगारांमार्फत कचरा संकलन व शहर स्वच्छतेचे सुरु ठेवले मात्र या कामगारांची संख्या कमी असल्याने शहराच्या अनेक भागांत स्वच्छतेची ऐसीतैशी झाली. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत.

कामगारांच्या संपामुळे गेल्या पाच दिवसांपासून कचरा संकलनाचे काम ठप्प पडले. नाली उपसाचे कामही बंद पडले. परिणामी शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. मुख्य बाजारपेठेत अनेक ठिकाणी कचरा साचला आहे. घराघरांतील कचऱ्याच्या डसबीन पूर्णतः भरल्या आहेत. घंटागाडी फिरत नसल्याने गृहिणी त्रस्त झाल्या आहेत. परिणामी पालिकेने शहर स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे. स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या गडचिरोली शहरातील नाल्यांमधील गाळ उपसा करणे, गाळाची विल्हेवाट लावणे, घराघरांतील कचरा संकलित करणे, कचऱ्याचे विलगीकरण करणे आदी कामांची निविदा काढून कंत्राटदारांना हे काम सोपविले जाते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शहरातील या सर्व कामाचे अमरावती येथील कंत्राटदारांकडे हे काम सोपविले. सदर कंत्राटदारांकडे सफाई कामगारांचे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याची मजुरीची रक्कम प्रलंबित होती. दरम्यान कंत्राटदाराने दोन दिवसांपूर्वी सफाई कामगारांचे ऑक्टोबर महिन्याचे एक महिन्याची मजुरी अदा केली. उर्वरित नोव्हेंबर महिन्याचे मजुरीचे पैसे १५ दिवसांनंतर अदा करणार अधिकाऱ्यांसमोर सांगितले. असल्याचे दरम्यान नगरपरिषद प्रशासन, कंत्राटदार व कामगारांमध्ये सकारात्मक चर्चा घडून आली. आता १० डिसेंबर, मंगळवारपासून संपकरी सर्व सफाई कामगार कामावर परतणार असून शहर स्वच्छतेचे काम पूर्ववत सुरळीत होणार आहे, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली असून मंगळवारी कामगार कामावर येतात काय, याकडे शहरातील नागरीकांचे लक्ष  लागले आहे.

Comments are closed.