Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिंगाडे तोडण्यास गेलेल्या पतीचा तलावात बुडून मृत्यू ,

पत्नीच्या डोळ्यासमोरच घडली घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : वडसा (देसाईगंज) तालुक्यातील चोप येथील उमरावसिंग जयसिंग दुधबर्वे, वय ५८ वर्ष  रा. चोप हे टायरच्या ट्यूबवर बसून सिंगाडे काढण्यासाठी छोट्या तलावात (बोडी) उतरलेले होते. परंतु  ट्यूब उलटल्याने सदर  व्यक्तीचा  दि. २८.डिसेंबर  रोजी पाण्यात  बुडून मृत्यू झाला.

उमरावसिंग जयसिंग दुधबर्वे हे तलावातील सिंगाडे काढून विकून आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. नेहमीप्रमाणे ते टायरच्या ट्यूबवर बसून सिंगाडे काढण्यासाठी छोट्या तलावात (बोडी) उतरले होते. परंतु अचानकपणे त्याचे ट्यूब पलटी झाल्याने ते खोल पाण्यात पडले.  तेव्हा त्यांची पत्नी तलावाच्या  काठावरील शेतात  तुरीच्या शेंगा तोडत होती. सदरची घटना होताना दिसताच तिने आरडाओरड केली, पण प्रयत्न निष्फळ ठरले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उमरावसिंग बुडताना पाहून त्यांचे पत्नीने आरडाओरड केली असता  लोक धावत आले व त्यांना  पाण्यातून  बाहेर काढले, परंतु  तोपर्यंत त्यांचा मृत्यु झालेला होता. यांच्या मागे  पत्नी,  एक मुलगा, सून, दोन विवाहित मूली, जावई, नातवंडे असा बरच मोठा आप्तपरिवार आहे. सदर  घटनेने दुधबर्वे कुटुंबीय शोकमग्न झाले असून घटनेची माहिती देसाईगंज पोलिसांना देण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी करिता  ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला.

हे ही वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

LIC कडे आहेत 881 कोटी रुपये

पत्नीने चारित्र्यावर संशय घेतल्याने पतीची आत्महत्या..

Comments are closed.