लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : दि. ३० डिसेंबर रोजी सावली तालुक्यातील धनराज बोलिवार, रवी वासेकर व मोहन वाकुडकर हे तीघे गडचिरोली वरून गोगाव येथे जात असतांना सकाळी १० वाजता त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.
सावली तालुक्यातील तीन जण मिरचीची तोड करण्यासाठी मजूर शोधण्याकरिता गडचिरोली जवळील गोगाव येथे जात असतांना गडचिरोलीपासून दोन किमी अंतरावरील कठाणी नदीपुलाजवळ सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसल्याने त्यांचा अपघात झाला. दुचाकीवर धनराज बोलिवार वय ५२ वर्ष रा. उपरी, रवी वासेकर वय ४८ वर्ष व मोहन वाकुडकर वय ४८ वर्ष दोघेही रा. भान्सी, ता. सावली जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी होते. यातील मोहन वाकुडकर हा गंभीर जखमी असून त्याला गडचिरोली सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.
सदरचा अपघात बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. दुचाकीवरील तिघेही दारू पिऊन होते.त्यामुळे चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या दुचाकीची दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेत तिघेही जमिनीवर कोसळले. यात तिघांच्याही डोक्याला मारला लागला असून मोहन हा बेशुद्ध पडला असल्याने नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिकेने तिघांनाही जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
हे ही वाचा,
Comments are closed.