Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लॉयड्सच्या वाढीव प्रकल्पाला नागरिकांचा एकमताने जनसुनावणीत होकार

जनसुनावणीत कौतुकासह विकासाची अपेक्षा; ३० गावांतील सरपंच, पदाधिकारी, नागरिक, लोकप्रतिनिधीची उपस्थिती

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली: उद्योगविहीन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकासाचा उजेड पेरत असलेल्या लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या सुरजागड लोहप्रकल्पात होणाऱ्या वाढीव प्रकल्पाच्या उत्खननासाठी पर्यावरणविषयक जनसुनावणीत नागरिकांनी या प्रकल्पासाठी एकमताने होकार दिला. तसेच औद्योगिक विकासासोबतच सर्वांगीण विकासाची रास्त अपेक्षा व्यक्त केली.

प्रकल्पाच्या परिसरातील ३० गावांतील सरपंच, पदाधिकारी, नागरिक व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मंगळवार (ता. २८ ) स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही पर्यावरणविषयक जनसुनावणी पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा होते. विशेष पाहुणे म्हणून खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी मंत्री तथा अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, आरमोरीचे आमदार रामदास मसराम, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार, पुरसलगोंदीच्या सरपंच अरुणा सडमेक, तोडसाच्या सरपंच वनिता कोरमी, उपसरपंच प्रशांत आत्राम, नागुलवाडीचे सरपंच गावडे, बुर्गीचे सरपंच व उडेराचे सरपंच तसेच प्रकल्पबाधित क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, गाव पाटील, भूमिया, गायता, पर्यावरण विभागाचे अधिकारी, परिसरातील जनसमुदाय तसेच लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पामुळे स्थानिक नागरिक, युवक, युवतींच्या हाताला काम मिळाले आहे. त्यामुळे या भागातील युवक, युवती आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. लायड्स मेटल्स कंपनीच्या माध्यमातून या भागात रोजगार निर्मितीला वेग देण्यात आला असून असून या ठिकाणी नव्याने तब्बल ६ हजार युवक, युवतींची पदभरती केली जाणार आहे. या कंपनीमध्ये अहेरी विधानसभा क्षेत्रातील स्थानिक युवकांना प्राधान्य देण्याची मागणी उपस्थित लोकप्रतिनिधींनी केली. लायड्सने हेडरी येथे सुसज्ज असे रुग्णालय निर्माण करून अतिदुर्गम एटापल्ली तालुक्यातील रुग्णांसाठी योग्य उपचाराची सोय करून दिली आहे. असेच रुग्णालय आलापल्ली किंवा अहेरी येथे सुरू करून या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली.दरम्यान, परिसरातील नागरिकांनी या प्रकल्पामुळे परिसराचा विकास, आरोग्य, शिक्षण, रोजगाराची मागणी करतानाच पर्यावरण संतुलन राखले जाईल,अशी अपेक्षा व्यक्त केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लायड्स मेटल्सने रुग्णालयासोबत परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सीबीएसई अभ्यासक्रमाची शाळा सुरू केली आहे. त्यामुळे या भागातील गरजू, गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची सोय झाली आहे. परिसरातील पर्यावरण व संस्कृतीला कुठलीही बाधा पोहोचणार नसल्याने शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते आदी सुविधा निर्माण करण्याकडे कंपनीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडलेल्या पर्यावरणविषयक जनसुनावणीला एटापल्ली तालुक्यातील बहुसंख्य नागरिक, युवक, युवती, महिला उपस्थित होते.

Comments are closed.