Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठाच्या पुढाकाराने शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट कार्यशाळेचे आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली: “अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट (ABC) हे विद्यार्थ्यांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणादरम्यान मिळालेले क्रेडिट्स संचयित करणे आणि हस्तांतरित करणे सुलभ करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात अधिक लवचिकता आणि गतिशीलता प्रदान करते.” राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा संदेश विविध विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने कार्यशाळेची मदत घेतली जात आहे.

येथील अॅड. विठ्ठलराव बनपूरकर मेमोरियल कला व वाणिज्य महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठाच्या पी. एम. उषाअंतर्गत राज्यस्तरीय कॅपसिटी बिल्डिंग कार्यशाळेत शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिटचे आयोजन करण्यात आले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कार्यशाळेत विद्यापीठाचे डॉ. मनीष देशपांडे यांनी शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट तसेच एबीसी आयडीचे महत्त्व, उद्देश, एबीसी आयडी कशी तयार करावी, डिजी लॉकर यावर मार्गदर्शन केले. कार्यशाळा ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेण्यात आली.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. कामडी होते, तर मार्गदर्शक डॉ. मनीष देशपांडे, विशेष अतिथी म्हणून डॉ. पी. एस. काळे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. डी.एम. नंदेश्वर यांनी केले. संचालन प्रा. पी. आर. कुमरे, तर आभार प्रा. भगत नुरुटी यांनी मानले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यशाळेच्या आयोजनातून गोंडवाना विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.