Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात भामरागड जंगल परिसरात चकमकीत एक C- 60 जवान शहीद

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकसपर्श नेटवर्क 

गडचिरोली:  जिल्ह्यात भामरागड आणि छत्तीसगड सीमेवर दिरंगी-फुलणार जंगल परिसरात, सुरक्षा दलं आणि नक्षलवाद्यामध्ये झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी पथक सी ६० दलातील एक जवान शहीद झाला. महेश नागुलवार हे या जवानाचं नाव आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांचा तळ होता. पोलिसांना ही माहिती प्राप्त होताच, पोलिसांनी या परिसरात कालपासून शोधमोहिम राबवली. आज या परिसरात पोलिसांनी घेरा घातला असताना, नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुर केला. सुरक्षा दलांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र या चकमकीत जवान महेश नागुलवार यांना गोळी लागली. उपचारासाठी त्यांनी हेलिकाॅप्टरने हलवण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

त्या परिसरात चकमकीवेळी २५ ते ३० नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती असून त्यांमध्ये त्यांच्या टोळीचा म्होरक्या रघुही होता. या ठिकाणी पोलिसांची शोधमोहिम अद्याप सुरुच आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली पोलिसांची या नक्षलवाद्यांचा समूळ नायनाट कऱण्यासाठी कारवाई सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी बिजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत छत्तीसगड पोलिसांनी ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. यामध्ये दोन जवानही शहीद झाले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.