Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

टाटा कन्सलटन्सी सर्विसेस सोबत गोंडवाना विद्यापीठाचा सांमजस्य करार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेला बारा वर्षे पूर्ण झालेली असून विद्यापीठ परिक्षेत्र अंतर्गत स्थानिक युवकांचा उच्च शिक्षणातील नोंदणी दर वृद्विगंत करणे तसेच सदर युवकांना रोजगारक्षत कौशल्य प्रदान करणे अशा उदात्त हेतूने गोंडवाना विद्यापीठाने नुक्ताच टाटा कन्सलटन्सी सर्विसेस सोबत माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगारक्षम प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविण्या हेतू सांमजस्य करारावर स्वाक्षरी केली.

सदर करार अंतर्गत ३५ हुन अधिक तीन महिने कालावधीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सवलतीच्या शुल्कासह चालविण्यात येत आहेत, यासंदर्भात स्वाक्षरी समारोह करीता टाटा कन्सलटन्सी सर्विसेस तर्फे श्री. अभ्यीन पांडे, महाव्यवस्थापक, पुणे तसेच गोंडवाना विद्यापीठ तर्फे डॉ. प्रशान्त बोकारे, मा. कुलगुरु, डॉ. श्रीराम कावळे, मा. प्र-कुलगुरु, डॉ. मनिष उत्तरवार, मा. संचालक, न. न. व सा.. डॉ. श्याम खंडारे, मा. अधिष्ठाता, मानव विज्ञान विद्याशाखा, डॉ. धनराज पाटील, मा. संचालक, IQAC, श्री. भास्कर पठारे, मा. वित्त व लेखाधिकारी, श्री. अशिष घरई, मा. मुख्य कार्यक्रम अधिकारी, विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र इत्यादी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याअनुषंगाने विद्यापीठ परिक्षेत्रातील स्थानिक विद्यार्थ्यांनी सदर अभ्यासक्रमाकरीता प्रवेश निश्चित करण्याकरीता विद्यापीठ संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार क्षमता विकसित करावी असे डॉ. मनिष उत्तरवार, मा. संचालक, न. न. व सा. यांच्यातर्फे जाहिर आव्हान करण्यात येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.