Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भुजंगरावपेठा येथे अवैध दारू वाहतूक उघड; दोन आरोपी ताब्यात

आरोपीने दारू वाहनात तस्करी करण्यासाठी लढविली अनोखी शक्कल..

गडचिरोली जिल्ह्यात संवेदनशील अवैध दारूच्या वाहतुकीचे सत्र सुरूच असल्याचे चित्र समोर येते आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेवर अधिक जबाबदारी ने काम करून तस्करांना वेळीच अदल घडवून आणावी अशी मागणी जिल्हाभरात जोर धरू लागली आहे..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली : अहेरी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अवैध दारू साठा पकडण्यात यश मिळवले आहे. अहेरी तालुक्यातील भुजंगरावपेठा गावाजवळील पश्चिमेकडील भागात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे ५.९८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दारू तस्करी प्रकरणी म्हणून मिळाली गुप्त माहिती

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दारू तस्कर बाबत २७ एप्रिल रोजी पहाटे १.३० ते २.३० वाजण्याच्या सुमारास अहेरी पोलिसांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली होती की, एका मालवाहतूक वाहनातून अवैधरित्या दारूची वाहतूक केली जात आहे. यावरून पोलिस निरीक्षक स्वप्निल ईज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सापळा रचून तपासणी केली. तपासणीदरम्यान, आरोपी अनवर खान अबुलहसन खान (रा. मौलाना आझाद वार्ड, बल्लारपूर) आणि सिद्धार्थ भास्कर रंगारी (रा. रविंद्र नगर, बल्लारपूर) यांच्या मालकीच्या अशोक लेलॅंड कंपनीच्या वाहनातून मोठ्या प्रमाणावर दारू साठा आढळून आला.

वाहनाच्या फ्लोअर पॅनेलच्या खाली विशेष कप्पे बनवून, त्यात विविध प्रकारची देशी व विदेशी दारू लपवण्यात आली होती. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात ROYAL STAG ब्रँडच्या ४८ बाटल्या (किंमत १,४४,००० रुपये), HAYWARDS 5000 PREMIUM STRONG BEER च्या ८६,४०० रुपयांची बिअर, आणि रॉकेट देशी दारू संत्रा प्रकारच्या ४८,००० रुपयांच्या बाटल्या यांचा समावेश आहे. तसेच आरोपींच्या ताब्यातील चारचाकी मालवाहतूक वाहन (किंमत अंदाजे ३ लाख रुपये) व दोन मोबाईल फोन्स (किंमत प्रत्येकी १०,००० रुपये) जप्त करण्यात आले.

अहेरी पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा केला नोंद

दारू तस्करी प्रकरणी अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०७/२०२५ अन्वये, महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) व ८३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक स्वप्निल ईज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

तस्करांनी दारूबंदी कायद्याचा भंग..

राज्यातील दारूबंदी कायद्यानुसार, कोणतीही व्यक्ती परवानगीशिवाय मद्याचा साठा करणे, वाहतूक करणे किंवा विक्री करणे कायद्याने गुन्हा मानला जातो. अशा गुन्ह्यांवर कठोर शिक्षा होऊ शकते.

अहेरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू..

अहेरी पोलिसांनी आरोपींकडे चौकशी सुरू केली असून, या अवैध दारू साठ्यामागे आणखी कोणते जाळे कार्यरत आहे का, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणात आणखी काही आरोपींच्या अटकेची शक्यता वर्तवली जात असली तरी दारू तस्करी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत..

Comments are closed.