Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्मशानाजवळ रंगलेला ‘कोंबडा बाजार’ उधळला! मुल पोलिसांची थरारक कारवाई; ७.२४ लाखांचा ऐवज जप्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुल, दि,१० : पोंभुर्णा तालुक्यातील चक फुटाणा गावाजवळील स्मशानभूमीजवळ सुरू असलेला अवैध कोंबडा झुंज जुगार अड्डा अखेर मुल पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतले असून, घटनास्थळावरून तब्बल ७ लाख २४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित १० आरोपी वाहनं सोडून फरार झाले.

गोपनीय माहिती, आणि ‘स्मशान’जवळ रंगणारा जीवघेणा जुगार!

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

८ जून रोजी संध्याकाळी ५.३० ते ६.३० च्या दरम्यान, मुल पोलिसांना गोपनीय बातमी मिळाली होती की चक फुटाणा स्मशानभूमी परिसरात कोंबड्यांच्या झुंजी लावून जुगार खेळला जात आहे. लगेच सपोनि अमितकुमार आत्राम यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक घटनास्थळी रवाना झाले.

तिथे पोहोचल्यावर पोलिसांनी पाहिले की, काही इसम कोंबड्यांच्या पायाला धारदार काती बांधून त्यांची झुंज लावत होते आणि त्या झुंजीवर मोठ्या प्रमाणावर पैशांची बाजी लावली जात होती. पोलिसांची चाहूल लागताच गोंधळ उडाला आणि अनेक आरोपी पळून गेले. मात्र पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अटक करण्यात आलेले आरोपी..

1. संजय रामदास सोनटक्के (वय ४५, रा. चक फुटाणा)

2. प्रविण चरणदास सोनटक्के (वय ३५, रा. देवाळा खुर्द)

3. भिमा शंकर पेंदोर (वय ३४, रा. कवडजई, ता. बल्लारशाह)

घटनास्थळी जप्त केलेला मुद्देमाल ..

मुद्देमाल किंमत (₹):

९ मोटारसायकली ४,५०,०००

१ कालीपिली वाहन २,५०,०००

पाच जखमी कोंबडे १,३००

२० लोखंडी कात्या १,०००

नगदी (अंगझडतीतून) २,४००

एकूण ७,२४,७००

या मुद्देमालासह कोंबडे आणि धारदार शस्त्रांचा वापर झाल्याचे दिसून आले आहे, ज्यातून या जुगारात हिंसक स्वरूपाचे पैशांचे व्यवहार सुरू असल्याचे स्पष्ट होते.

गुन्हा दाखल, उर्वरित आरोपींचा शोध सुरू..

याप्रकरणी पोलीस स्टेशन मुल येथे गुन्हा क्र. २१५/२०२५ नोंदवण्यात आला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित १० आरोपींचा शोध सुरु असून, त्यांच्या वाहनांवरून ओळख पटवली जात आहे.

कारवाईमागे पोलिसांचा संयुक्त तपास आणि तत्परता..

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव (अति. कार्यभार, उपविभाग मुल) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सपोनि सुबोध वंजारी (प्रभारी अधिकारी), पोहवा जमीरखान पठाण, पोहवा सुनिल कुळमेथे, पोअं वेदनाथ करंबे, पोअं गणेश मेश्राम, पोहवा भोजराज मुंडरे, पोअं नरेश कोडापे, पोअं पंकज बगडे, चापोअं शिवशंकर हुकरे आदींचा समावेश होता.

जनतेत समाधान, पोलिसांचे कौतुक…

या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत असून, कोंबडा बाजाराच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगाराच्या धंद्याला पोलिसांनी चपराक दिली आहे. अनेक दिवसांपासून या भागात अशी गुप्त जुगारअड्ड्यांची चर्चा होती, पण पोलिसांनी केलेल्या या ठोस कारवाईने अवैध कृत्यांना चाप बसला आहे.

Comments are closed.