Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीत शेतकरी न्याय पदयात्रा व मशाल मोर्चा; हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला केले प्रश्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १२ जून :

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज गडचिरोलीत यांनी विविध प्रश्न सरकारला केले. “जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण न करणारे मोदी हे योगी नव्हे, तर सत्ताभोगी असल्याचा आरोप केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ‘शेतकरी न्याय पदयात्रा’ व मशाल मोर्चा गडचिरोली शहरात काढण्यात आला. मतचोरीची चौकशी, शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या पदयात्रेमध्ये काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी सपकाळ म्हणाले की, “११ वर्षांपासून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, पण त्यांनी दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केलेले नाही. फकीर असल्याचे सांगणारे मोदी महागडे कपडे व वस्त्रं वापरतात. ते अधर्मी असून सत्तेच्या मोहात अडकले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबईत जशी मराठी माणूस हरवला, तशीच स्थिती गडचिरोलीत होईल, ही काळजी आम्हाला वाटते.”

यावेळी विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप-शिवसेना युती सरकारवर जोरदार टीका केली. “तिघे भाऊ महाराष्ट्र लुटत आहेत. शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहे, कर्जमाफी नाही, हमीभाव नाही. लाडकी बहिण योजना बंद करण्याचा डाव सुरू आहे. २१०० रुपये देण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने आता ५०० रुपयेही हातात टेकवले आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

पदयात्रेत मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :

1. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी व हमीभाव मिळावा.

2. वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई १ लाख रुपये करण्यात यावी.

3. हेक्टरी जाहीर केलेला बोनस त्वरीत वितरित करावा.

4. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी.

5. सोलर पंप व वीजजोडणीसंबंधी सुलभ व विश्वासार्ह सेवा द्यावी.

6. विमानतळासाठी सुपीक शेतजमिनीऐवजी झुडपी जमिनीचा वापर करावा.

7. शेतजमिनी कवडीमोल दरात खरेदी करणाऱ्यांची चौकशी करावी.

8. वनपट्टे सात पिढींच्या अटीशिवाय द्यावेत.

9. खनिज वाहतुकीसाठी बायपास तयार करून शहरातील वाहतूक थांबवावी.

10. आरोग्य केंद्रात डॉक्टर, औषधांचा पुरवठा वेळेवर व्हावा.

11. स्थानिकांना नोकऱ्यांत प्राधान्य व शासकीय पदांची भरती तातडीने करावी.

12. धरणाच्या विसर्गामुळे होणाऱ्या पूरस्थितीवर प्रभावी उपाययोजना करावी.

13. रोजगार हमी योजनांचे देयके, अनुदाने तातडीने वितरित करावी.

14. खरीप हंगामासाठी बियाणे, खत, कर्ज या योजनांमध्ये सुलभता असावी.

15. राष्ट्रीय महामार्ग व मुख्य रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत.

या पदयात्रेत खासदार नामदेव किरसान, प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, आमदार, पदाधिकारी, युवक काँग्रेस व महिला काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण मोर्चा शिस्तबद्ध व शांततेत पार पडला.

Comments are closed.